ETV Bharat / city

मुंबईत आज 5,197 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस; 8 जणांना सौम्य दुष्परिणाम

author img

By

Published : Jan 27, 2021, 10:28 PM IST

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अ‌ॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. ही त्रुटी दूर केल्यानंतर राज्यभरात 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

कोरोना लसीकरण न्यूज
कोरोना लसीकरण न्यूज

मुंबई - मुंबईत आज 10 लसीकरण केंद्रांवर 77 बूथवर 5197 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 8 जणांवर सौम्य दुष्परिणाम जाणवून आले आहेत. मुंबईत आजतागायत 23 हजार 399 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अ‌ॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. ही त्रुटी दूर केल्यानंतर राज्यभरात 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

आज झालेले लसीकरण -
मुंबईत आज 7, 700 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महापालिकेच्या 10 तर राज्य सरकारच्या 1 अशा एकूण 11 लसीकरण केंद्रांमधील 77 बूथवर 5, 197 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत आज एकूण उद्दिष्टापेक्षा 68 टक्के लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 595, सायन येथील टिळक रुग्णालयात 514, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 456, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 534, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात 218, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 829, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात 783, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटलमध्ये 557, बांद्रा भाभा हॉस्पिटलमध्ये 317, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटलमध्ये 18 व सेव्हन हिलमध्ये 376 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

हेही वाचा-लसी सुरक्षित; आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीकरणामध्ये सहभागी व्हावे - राजेश टोपे

आजतागायत 23,399 लसीकरण पूर्ण-
मुंबईत 16 जानेवारीपासून आजपर्यंत 23 हजार 399 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 3712, सायन येथील टिळक रुग्णालया 2,021, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 2,591, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 2,535, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात 626, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 3814, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात 3,455, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटलमध्ये 2, 345, बांद्रा भाभा हॉस्पिटलमध्ये 1,761, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटलमध्ये 163 व सेव्हन हिलमध्ये 376 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

दरम्यान, केंद्र सरकारने आपत्कालीन स्थितीत कोरोनापासून बचावासाठी सिरमची कोशिल्ड आणि भारत बायोटेकच्या को-व्हॅक्सिनला परवानगी दिली आहे. त्यामुळे देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आढळलेल्या मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.