ETV Bharat / city

BMC Becomes Corona Hotspot : मुंबई महापालिका मुख्यालय बनतेय कोरोना हॉटस्पॉट - Omicron Variant

मुंबईमध्ये डिसेंबरपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पालिका मुख्यालयात ( BMC ) ताप, सर्दी, खोकला झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत गेल्या आठवडाभरात वाढ झाली आहे. त्यातच मागील आठवड्यात रोज 4 ते 5 कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामुळे पालिका मुख्यालय कोरोनाचा हॉटस्पॉट ( BMC Becomes Corona Hotspot ) बनत असल्याचे दिसत आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 6, 2022, 3:28 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पालिका मुख्यालयात ( BMC ) ताप, सर्दी, खोकला झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत गेल्या आठवडाभरात वाढ झाली आहे. त्यातच मागील आठवड्यात रोज 4 ते 5 कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामुळे पालिका मुख्यालय कोरोनाचा हॉटस्पॉट ( BMC Becomes Corona Hotspot ) बनत असल्याचे दिसत आहे.

बोलताना प्रतिनिधी

पुन्हा वाढू लागली रुग्णसंख्या -

मुंबईत मार्च, 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा पालिकेने केलेल्या योग्य नियोजनामुळे आणि नागरिकांच्या सहकार्याने थोपवण्यात आल्या आहेत. डिसेंबरपासून मुंबईत पुन्हा कोरोनाग्रस्तांची वाढत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला मुंबईत 100 ते 200 च्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. त्यात जानेवारी महिन्यात वाढ होऊन 5 जानेवारीला 15 हजार 166 रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या ( Omicron Variant ) प्रसारामुळे ही रुग्णसंख्या वाढल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे त्याचा फटका मुंबई महापालिका मुख्यालयालाही बसत आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट -

मुंबई महापालिका मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी असे त्रास जाणवl आहेत. मागील आठवड्यापासून असा त्रास होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पालिका मुख्यालयातील दवाखान्यात कर्मचाऱ्यांची गर्दी वाढली आहे. या दवाखान्यात रोज सुमारे 30 कर्मचारी, अधिकारी औषध घेत होते. गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. रोज 70 ते 80 कर्मचारी, अधिकारी या दवाखान्यात औषध घेत आहेत. दरम्यान, यापैकी काहींच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात असून रोज 4 ते 5 कर्मचारी अधिकारी कोरोनाग्रस्त आढळत असल्याचे समजते. यामुळे मुंबई महापालिका मुख्यालय कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याचे दिसत ( Corona Hotspot ) आहे.

का वाढतोय पालिका मुख्यालयात कोरोना..?

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन पालिकेकडून नागरिकांना केले जाते. मास्क न लावल्यास सामान्य मुंबईकर नागरिकांकडून 200 रुपये दंडही वसूल केला जातो. मात्र, पालिकेकडून सामान्य नागरिकांना ज्या त्रिसूत्रीचा अवलंब करा, असे सांगितले जाते. त्याच पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्रिसूत्रीचा अवलंब केला जात नसल्याने पालिका मुख्यालयात कोरोनाचा प्रसार वाढल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाची त्रिसूत्री न पाळणाऱ्या आपल्याच कर्मचारी अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

स्थायी समिती अध्यक्ष कोरोनाग्रस्त -

पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रक्तदाबाचा त्रास असून ताप आल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्लाने यशवंत जाधव हे रुग्णालयात भरती झाले आहेत.

हेही वाचा - MH Police work from Home: पोलीस कर्मचाऱ्यांनाही 'वर्क फ्रॉम होम'; गृहविभागाने 'हे' दिले आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.