ETV Bharat / city

मुंबईत 'या' दोन दिवशी १५ टक्के पाणीकपात तर घाटकोपर, कुर्ल्यात पाणीपुरवठा बंद - कुर्ल्यात पाणीपुरवठा बंद न्यूज

मुंबईमध्ये येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामामुळे २२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २३ डिसेंबर रोजी सकाळी १० दरम्यान २४ तासांसाठी १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे. तर घाटकोपर येथील एन व एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

bmc announces water cut in ghatkopar and kurla on december-22 and 23
मुंबईत 'या' दोन दिवशी १५ टक्के पाणीकपात तर घाटकोपर, कुर्ल्यात पाणीपुरवठा बंद
author img

By

Published : Dec 19, 2020, 2:03 AM IST

मुंबई - येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामामुळे २२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २३ डिसेंबर रोजी सकाळी १० दरम्यान २४ तासांसाठी मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे. तर घाटकोपर येथील एन व एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे, अशी माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.

दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद -
बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या २७५० मिलीमीटर व्यासाच्या उर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटच्या दुरुस्तीचे काम दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवार, दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तास १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तसेच मंगळवार, दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी एन विभागामध्ये घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे कप्पा १ ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम नियोजित आहे.

पाणी जपून वापरावे -
हे काम मंगळवार, दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबईत मंगळवार, दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी पाणीपुरवठ्य़ामध्ये १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर एन व एल विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी या पाणी कपात कालावधीत पाण्याचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

या विभागात १५ टक्के पाणी कपात -
- मुंबई शहर येथील ए, बी, सी, डी, ई, जी/उत्तर व जी/दक्षिण विभाग
- पश्चिम उपनगरात एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व, के/पश्चिम, पी/उत्तर, पी/दक्षिण, आर/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण विभाग
- पूर्व उपनगरात एल, एन, एस विभाग

या विभागात पाणी बंद -
एन विभाग – प्रभाग क्रमांक १२३, १२४, १२६, १२७, १२८, १३० मधील आनंदगड, शंकर मंदीर, राम नगर, हनुमान मंदीर, राहूल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षानगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी, वर्षानगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर, डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २, अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ.एन.जी.सी. वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर, आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर, सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजू टेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी - पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.

कुर्ला एल विभाग - प्रभाग क्रमांक १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६४ मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग इत्यादी - पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.

हेही वाचा - मेट्रो कारशेडसाठी इतर जागांची चाचपणी करा, मुख्यमंत्र्यांचे एमएमआरडीएला निर्देश

हेही वाचा - कोरोनाचा फैलाव थांबून सामने खेळण्याचीही परवानगी मिळू दे - खेळाडूंची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.