मुंबई - मुंबईमध्ये मागील दीड वर्षे कोरोनाचा प्रसार ( Corona in Mumbai ) आहे. त्यातच आता ओमायक्रॉन या व्हेरियंटचे ( Omicron Variant in Mumbai ) रुग्ण आढळून येत आहेत. विषाणूचा हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जे नागरिक मास्क घालत नाहीत अशा नागरिकांकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर ( Railway Passenger ) पालिका ( BMC ), क्लिनअप मार्शल तसेच पोलिसांकडून ( Mumbai Police ) कारवाई करण्यात येत आहे. मागील ६७९ दिवसांत तब्बल ४४ लाख ७१ हजार २३९ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ८८ कोटी ९० लाख ८१ हजार ८७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
४४ लाख नागरिकांवर कारवाई - मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याने एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली. १७ एप्रिल, २०२० ते ८ फेब्रुवारी, २०२२ या ६७९ दिवसांत ४४ लाख ७१ हजार २३९ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ८८ कोटी ९० लाख ८१ हजार ८७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने ३५ लाख ५४ हजार ६०२ नागरिकांवर कारवाई करत ७० कोटी ५७ लाख ५४ हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी ८ लाख ९२ हजार ७४६ नागरिकांवर कारवाई करत १७ कोटी ८५ लाख ४९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ नागरिकांवर कारवाई करून ४७ लाख ७८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा त्रिसूत्रीचे पालन करा - कोरोना किंवा इतर कोणत्याही विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी लस घेतली असली किंवा त्यांच्यामध्ये अँटोबॉडीज् निर्माण झाल्या असल्या तरी त्यांना कोरोनाची लागण होऊ शकते, अशा नागरिकांना सौम्य लक्षणे होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी केले आहे.
हेही वाचा - BMC Will Take Action Water Meters : नादुरुस्त पाण्याच्या मीटरबाबत मुंबईकरांवर होणार कायदेशीर कारवाई