ETV Bharat / city

Marathi Boards on Shops : मुंबईत मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवरील कारवाई 'या' कारणामुळे थांबली

राज्य सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला (municipality action of Marathi boards on shops) होता. मात्र दुकानदारांवर कोणत्या प्रकारची कारवाई करायची ? याचा अॅक्शन प्लॅनच ठरला नसल्यामुळे आज कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली (municipality action stopped due to no action plan) आहे.

Action against shops without Marathi plates
मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवरील कारवाई
author img

By

Published : Oct 4, 2022, 10:25 AM IST

मुंबई : राज्य सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीत दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहे. तीन वेळा संधी देऊनही ५० टक्के दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या आहेत. इतर ५० टक्के दुकानदारांनी अद्याप मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. यामुळे आजपासून दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला (municipality action of Marathi boards on shops) होता. मात्र दुकानदारांवर कोणत्या प्रकारची कारवाई करायची ? याचा अॅक्शन प्लॅनच ठरला नसल्यामुळे आज कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली (municipality action stopped due to no action plan) आहे.

कारवाईचा दिला होता इशारा - मुंबईत सुमारे ५ लाख दुकाने आहेत. मराठी पाट्या लावण्यासाठी पालिकेने ३१ मे, ३० जून व ३० सप्टेंबर अशी तीन वेळा डेडलाईन दिली होती. या कालावधीत सुमारे ५० टक्के म्हणजे सुमारे अडीच लाख दुकानांवर मराठी पाटयांची अंमलबजावणी केली आहे. अद्याप इतर ५० टक्के दुकानदारांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे आज ३ ऑक्टोबरपासून वॉर्डनिहाय तपासणी करून दुकानांवर मराठी पाट्या न दिसल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या ७५ अधिकार्‍यांची टीम तयार करण्यात आली होती. सर्व वॉर्डात होणार्‍या या कारवाईत दुकानावर मराठी पाटी नसल्यास रोख दंड आणि दंड न भरल्यास न्यायालयाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली (municipality action stopped) होती.

दसऱ्यानंतर निर्णय - पालिकेने आजपासून कारवाई करू असे सांगितले, असले तरी नेमकी काय कारवाई करायची ? याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. आज सोमवारी पालिका मुख्यालयात शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर आले होते. त्यांनी आढावा बैठक घेतली होती. या आढावा बैठकीच्या तयारीमध्ये वरिष्ठ अधिकारी व्यस्त असल्याने दुकानदारांवर कोणती कारवाई करायची ? याचा निर्णय घेतलेला नाही. उद्या मंगळवारी आणखी एक मंत्री पालिका मुख्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. यामुळे उद्याही याबाबत निर्णय होऊ शकत नाही. बुधवारी दसरा असल्याने पालिकेला सुट्टी असणार आहे. यामुळे दुकानदारांवर कोणती कारवाई करायची ? याचा अॅक्शन प्लॅन आता दसऱ्यानंतरच बनणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (Marathi Boards on Shops) दिली.

काय कारवाई होऊ शकते - २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे, बंधनकारक होते. मात्र नव्या नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या विचारात न घेता फलक मराठी भाषेतच असणे, बंधनकारक करण्यात आले आहे. यात मद्यविक्रेत्या दुकानांनाही आता महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास दुकानातील प्रत्येक कामगारामागे एक हजार किंवा न्यायालयाच्या निर्देशानुसार दंड वसूल केला जाऊ शकतो.

तीन वेळा मुदतवाढ - राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबईतील दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानांवर मराठी पाट्या ठळकपणे दिसतील, अशा प्रकारे लावण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने दुकानदारांना ३१ मे डेडलाईन दिली होती. व्यापारी संघटनांकडून अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी लावून धरण्यात आली होती. मराठी पाट्यांसाठी कलाकार उपलब्ध नसणे, मटेरिअल महागले आहे असे सांगत अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी ३० जून पर्यंत मुदत वाढ दिली होती. त्यानंतरही व्यापाऱ्यांनी मराठी पाट्या न लावता सहा महिन्याची मुदत वाढ मागितली. त्यावर आयुक्तांनी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.