ETV Bharat / city

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिका ताळ्यावर, राजीनामा पत्र स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटके दाखल करणार नामांकन

author img

By

Published : Oct 14, 2022, 9:55 AM IST

Updated : Oct 14, 2022, 10:58 AM IST

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके यांचा कर्मचारी पदाचा राजीनामा अखेर मुंबई महापालिकेने स्वीकारला आहे. सकाळी राजीनामा स्वीकारण्याचा पत्र द्यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार सकाळी ऋतुजा लटके मुंबई महापालिकेत दाखल झाल्या. मनपाकडून राजीनामा मंजूर झाल्याचे पत्र स्वीकारले

ऋतुजा लटके
ऋतुजा लटके

मुंबई - अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके यांचा कर्मचारी पदाचा राजीनामा अखेर मुंबई महापालिकेने स्वीकारला आहे. सकाळी राजीनामा स्वीकारण्याचा पत्र द्यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार सकाळी ऋतुजा लटके मुंबई महापालिकेत दाखल झाल्या. मनपाकडून राजीनामा मंजूर झाल्याचे पत्र स्वीकारले.

महिलेला लढाई लढावीच लागते! उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके म्हणाल्या, की मशाल चिन्ह आमच्यासाठी नवे चिन्ह नाही. महाविकास आघाडीतल सर्व पक्ष एकत्र आल्याने आनंद आहे. मतदारसंघात फिरून चिन्हाचा प्रचार करणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरणार आहोत. राजीनामा मंजूर झाल्याचे पत्र मिळतात ऋतुजा लटके यांनी पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. हा लढा आम्ही नक्कीच जिंकू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई महापालिका ताळ्यावर आली. त्यानंतर आज सकाळीच राजीनामा मंजूर केल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना देण्यात आले. अंधेरी पूर्व पोट निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मशाल चिन्हावर लटके निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत नामांकन अर्ज भरणार आहेत.

बीएमसीचे पत्र
बीएमसीचे पत्र

निकालानंतर लटके यांनी ही दिली होती प्रतिक्रिया या निकालानंतर लटके यांनी त्यांची प्रतिक्रियाही दिली. मला आशा होती मी पालिका कर्मचारी असल्याने पालिकेतून सहकार्य मिळेल मात्र तसे झाले नाही, असे त्या म्हणाल्या. म्हणूनच मला कोर्टात धाव घ्यावी लागली. माझ्या विरोधीत जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यांनी केले त्यांना मी ओळखत नाही. मात्र मी राजीनामा दिल्यानंतर माझ्यावर कुठलेही आरोप नाहीत. कोणतीही चौकशी सुरू नाही असे पत्र मला पालिकेने दिलेले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. मला विश्वास आहे की माझे पती रमेश लटके यांनी केलेले काम आणि जनतेवर मला विश्वास आहे. त्यामुळे माझा विजय निश्चितच होणार आहे असे देखील ऋतुजा लटके यांनी म्हटले.

राजकीय दबावामुळे राजीनामा मंजूर होत नव्हता- अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजकीय दबावामुळे राजीनामा मंजूर होत नव्हता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या या विरोधात लटके यांनी हायकोर्टात धाव घेतल्यानंतर घेतली न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने महापालिकेला खडसावले. पालिकेकडे विशेष अधिकार अधिकारी नाही, अशी प्रकरणे न्यायालयात येऊ नये, असे खडेबोल सुनावत सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Last Updated : Oct 14, 2022, 10:58 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.