मुंबई - गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये, याकरिता राज्यभरात रक्तदान शिबीर घेण्यात येत आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त नुकसान सलून व्यावसायिकांचा झाले आहे. असे असतानाही सलून सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून सर्वच आस्थापने बंद करण्यात आली आहेत. याचा सर्वाधिक फटका सलून ब्युटी पार्लर चालकांना बसला आहे. अशा बिकट परिस्थितीत सलून आणि ब्युटी पार्लर चालकांनी मुलुंड मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये बंद झालेले सलून 6 महिन्यांनी सुरू झाले होते. तर आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
सलून चालक आणि कामगार यांनी रक्तदान शिबिरात घेतला सहभाग-
सलून चालक संदीप चव्हाण म्हणाले, की आम्ही सरकारबरोबर आहोत. मात्र सरकारनेही आम्हाला साथ दिली पाहिजे. मागच्या लॉकडाऊनमध्येदेखील आम्ही सलून बंद ठेवली होती. लॉकडाऊनच्या अखेरीस सलून सुरू करण्यात आली. आमची गरीब सलूनवाले आहोत. भाड्याचे दुकाने असलेल्यांचे खूप हाल होत आहेत. आम्हीदेखील या लढाईमध्ये सरकारचे सोबत आहोत हे दाखवण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये सलून चालक आणि कामगार यांनी या रक्तदान शिबिरात भाग घेतला. आमचाही विचार सरकारने करावा ते जे नियम सांगतील ते पाळून आम्ही सलून उघडे करू, असे सलून चालक चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा-'लस उपलब्ध नसेल तर, 1 मेपासून सुरू होणारी लसीकरण मोहीम राबवायची कशी'