ETV Bharat / city

नाले सफाईवर भाजपाचा वॉच, ७ ते १२ एप्रिल करणार पाहणी

मुंबईची तुंबई झाल्याने मुंबईकरांना होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळावा म्हणून नालेसफाई व्यवस्थितपणे होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई भाजपाने आजपासून नालेसफाई पाहणी दौऱ्याचे आयोजन केलेले आहे. आज ७ एप्रिल पासून १२ एप्रिल २०२२ पर्यंत विविध नाल्यांची विविध ठिकाणी नाला सफाई पाहणी केली जाणार आहे.

नाले सफाईवर भाजपाचा वॉच,
नाले सफाईवर भाजपाचा वॉच,
author img

By

Published : Apr 7, 2022, 12:33 PM IST

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. नालेसफाई योग्य प्रकारे केली जात नसल्याचा आरोप दरवर्षी केला जातो. यासाठी भाजपाकडून आजपासून आठवडाभर नालेसफाई पाहणीसाठी दौरा आयोजित केला आहे. मुंबईत सर्वत्र माजी नगरसेवकांनी नाल्याची पाहणी करून त्याचे फोटो भाजपाच्या वॉररूमला पाठवावेत असे आदेश देण्यात आले आहेत. या दौऱ्यात भाजपाचे नेते, खासदार, आमदार सहभागी होणार आहेत.

नाले सफाईवर भाजपाचा वॉच - मुंबईची तुंबई झाल्याने मुंबईकरांना होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळावा म्हणून नालेसफाई व्यवस्थितपणे होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई भाजपाने आजपासून नालेसफाई पाहणी दौऱ्याचे आयोजन केलेले आहे. आज ७ एप्रिल पासून १२ एप्रिल २०२२ पर्यंत विविध नाल्यांची विविध ठिकाणी नाला सफाई पाहणी केली जाणार आहे. भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री व आमदार अ‍ॅड. आशिष शेलार तसेच माजी गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट हे सहभागी झाले आहेत. आज आशिष शेलार साऊथ अव्हेन्यू नाला, गझदर बंध, रामकृष्ण मिशन मार्ग व सखाराम बुवा पाटील मार्ग जंक्शन, खार, रुस्तमजी पॅरामाउंट बिल्डिंग जवळ. नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर एस.एन.डी.टी. नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला, कोलडोंगरी नाला आदी नाल्यांची पाहणी करणार आहेत.

माजी नगरसेवकांना या दिल्या सूचना - नालेसफाई दौऱ्याचे फोटो मुंबई भाजप वॉर रूमला रोज पाठवायचे आहेत. नाला सफाई पाहणी दौरा वरील वेळापत्रकानुसारच आपापल्या विभागातील भाजपचे वरिष्ठ नेते, खासदार, आमदार व सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करायचा आहे. दौऱ्यात माजी शिक्षणमंत्री व आमदार अॅड. आशिष शेलार व माजी गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा सहभागी होणार आहेत.यामुळे वेळापत्रकात शक्यतो बदल करू नये. स्थानिक वृत्तपत्रवाहिनीचे प्रतिनिधी, पत्रकार यांना आपण निमंत्रण द्यावे.नाला सफाई पाहणी दौरा करताना एका प्रशासकीय विभागात आवश्यक असेल तेथे गट करावे. तसेच आवश्यकता भासल्यास वरील वेळापत्रकापेक्षा अधिक दिवस लागल्यास तसे नियोजन करावे असे निर्देश भाजपाकडून माजी नगरसेवकांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा - Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसेंना समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.