ETV Bharat / city

Dahihandi शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची दहीहंडी - शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची दहीहंडी

भाजपच्या मुंबईच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलार यांनी वरळीत भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. जांबोरी मैदानात Jamboree Ground Mumbai हा उत्सव पार पडणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या गटाने केलेल्या बंडाचा फायदा घेत आता भाजपने मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्याची सुरुवात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून करण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या Dahihandi Festival माध्यमातून आशिष शेलार महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे या दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Dahihandi
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची दहीहंडी
author img

By

Published : Aug 17, 2022, 11:34 AM IST

मुंबई भाजपच्या मुंबईच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलार यांनी वरळीत भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. जांबोरी मैदानात हा Jamboree Ground Mumbai उत्सव पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या गटाने केलेल्या बंडाचा फायदा घेत आता भाजपने मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्याची सुरुवात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून करण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या Dahihandi Festivalमाध्यमातून आशिष शेलार महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे या दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. पालिकेत वरळीतून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचीही भाजपची खेळी आहे. त्यामुळे भाजपच्या खेळीला कितपत यश मिळते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपच वरळीत शक्ती प्रदर्शन वरळीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे, सुनील शिंदे व सचिन अहिर असे तीन आमदार आहेत. वरळी हा शिवसेनेचा पूर्वीचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यानंतर आता मुंबई अध्यक्ष पदावर पुन्हा वर्णी लागताच आशिष शेलार यांचे पहिले लक्ष्य वरळी ठरले आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात भाजपने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. वरळीतील जांबोरी मैदानात शुक्रवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन होणार आहे. त्यामुळे या उत्सवाला कसा प्रतिसाद मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

शिवसेनेकडून आता नवीन जागेचा शोध शिवसेना नेते आणि आमदार सचिन अहिर दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत असतात. सचिन अहिर आणि वरळीतील दहीहंडी उत्सव हे समीकरण ठरलेले आहे. पण यंदा पहिल्यांदाच भाजपने सर्वात आधी जांबोरी मैदान पटकावून अहिर यांच्यावर मात केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून दहीहंडी उत्सव आयोजनासाठी जांबोरी मैदान परिसरात नव्या जागेचा शोध सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा वरळीत पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव पाहायला मिळणार आहे. मात्र वरळीकर कुठल्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दुसरीकडे, जांबोरी मैदानाच्या सुशोभीकरणावर महापालिकेने अलीकडेच जवळपास २ कोटी रुपये खर्च केले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या आयोजनामुळे तो खर्च वाया जाऊ नये यासाठी तिथे उत्सव साजरा न करण्याची भूमिका घेतल्याचा दावा स्थानिक शिवसेना नेत्यांनी केला आहे.

हेही वाचा Ajit pawar criticize shinde goverment mla सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.