ETV Bharat / city

झारखंड सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न! बावनकुळेंमार्फत आमदारांना ५० कोटींची ऑफर दिल्याचा नवाब मिलक यांचा आरोप - नवाब मलिक यांची पत्रकार परिषद

झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार आहे. भाजपडून हे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवले जात आहे. महाराष्ट्रात पूरस्थिती असताना भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे झारखंडमध्ये गेले होते. त्यांनी काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्री पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Jul 26, 2021, 5:56 PM IST

मुंबई - झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्री पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न! बावनकुळेंमार्फत आमदारांना ५० कोटींची ऑफर दिल्याचा नवाब मिलक यांचा गंभीर आरोप. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

'महाराष्ट्र झारखंड पोलिसांना मदत करेल'

झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार आहे. भाजपडून हे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवले जात आहे. महाराष्ट्रात पूरस्थिती असताना भाजपचे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे झारखंडमध्ये गेले होते. असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार पाडताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा सहभाग पाहायला मिळाला होता असही मलिक म्हणाले आहेत. झारखंड सरकार पडताना भाजपच्या नेत्यांचा सहभाग आहे, हे स्पष्ट होते. झारखंड पोलिसांनी अभिषेक दुबे याला याप्रकरणी अटक केली असून, त्याने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये भाजपच्या दोन आमदारांचे नाव समोर आहे. हे कोण आमदार आहेत हे झारखंड पोलीस तपास करणार आहेत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज यांची नावे समोर आल्याचेही ते म्हणाले.

'झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार'

या तपासासाठी महाराष्ट्र सरकार हे झारखंड पोलिसांना सर्वपरीने मदत करणार असल्याचे, मलिक यांनी सांगितले. चौकशीनंतर सगळे समोर येईल. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होऊ शकत नाही. मात्र, अन्य राज्यात कर्नाटकप्रमाणे ऑपरेशन लोटस सुरू आहे. ५० कोटी रुपये आणि मंत्रीपद अशी झारखंडमधील काँग्रेस आमदारांना ऑफर होती, असा दावा मलिक यांनी केला. बावनकुळे हे तेथे एका मद्य व्यापाऱ्याला भेटले. कोणत्या हॉटेलमध्ये काँग्रेस आमदारांची बावनकुळे यांची भेट झाली, तेथे कोण होते, याबद्दल गुन्हा दाखल झाल्याचे मलिक यांनी सांगितले. आता चौकशीनंतर सगळी प्रकरणे उघड होतील. त्यात महाराष्ट्रातील कोण अधिकारी आहेत, हे देखील समोर येईल, असेही मलिक म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.