ETV Bharat / city

BJP women activists attack : दीपाली सय्यद विरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची पोलीसांत तक्रार

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद ( Deepali Syed ) यांच्या विरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी ( Offensive statement of Deepali Syed ) केली, त्यामुळे भाजप आक्रमक झाले आहे.

BJP women activists Divya Dhole
भाजप महिला कार्यकर्त्या दिव्या ढोले
author img

By

Published : May 29, 2022, 11:55 AM IST

Updated : May 29, 2022, 1:12 PM IST

मुंबई : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या विरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, ( Offensive statement against the Prime Minister ) त्यामुळे भाजप आक्रमक झाले आहे. जर केतकी चितळेवर पोलीस कारवाई करू शकतात, तर दीपाली सय्यद यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल करीत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

पोलिसांत तक्रार : भाजपच्या महिला कार्यकर्त्या दिव्या ढोले म्हणाल्या की, दीपाली सय्यदसारख्या महिला प्रसिद्धी मिळाविण्यासाठी मोठ्या व्यक्तीची नावे घेऊन अशी वक्तव्ये करतात. दीपाली सय्यद यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी आणि कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून देशात त्यांच्या विरोधात एक मजबूत संदेश जाईल. दीपाली सय्यद यांच्याविरोधात उद्यापर्यंत एफआयआर दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

पोलिसांनी मागितला वेळ : दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी भाजप महिला कार्यकर्त्यांकडे वेळ मागितला असून, व्हिडीओ तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : Deepali Syed Criticized Raj Thackeray : 'पुस्तके वाचून मत वाढत नाहीत अन् भाषणाने लोकांची पोट भरत नाही'

Last Updated : May 29, 2022, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.