ETV Bharat / city

अश्लील संदेश विरोधात भाजप प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची पोलिसांकडे तक्रार - obscene message case in PM Modi

दीपाली सय्यद यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार केल्याने आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत अश्लील, घाणेरडे संदेश पाठवले जात आहेत का? असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी उपस्थित केला आहे. आपण या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठविण्यात असल्याचे ढोले यांनी सांगितले आहे.

अश्लील संदेश विरोधात भाजप प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची पोलिसांकडे तक्रार

author img

By

Published : Jun 2, 2022, 9:05 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार केल्याने आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत अश्लील, घाणेरडे संदेश पाठवले जात आहेत का? असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी उपस्थित केला आहे. आपण या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठविण्यात असल्याचे ढोले यांनी सांगितले आहे.

एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ? - प्रगत महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या महिलांना अशीच वागणूक मिळणार आहे का? हीच राज्यातील महिला सुरक्षितता आहे का? असे सवालही श्रीमती ढोले यांनी यावेळी केले. श्रीमती ढोले म्हणाल्या की, दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले. या विरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये सर्व पुरावे सादर करून दोनवेळा तक्रार नोंदवण्यास गेले असता चौकशीचे व कायदेशीर सल्ल्याचे निमित्त करत एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही तक्रार दाखल केल्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॉर्फ केलेली छायाचित्रे पाठवून मला मानसिक त्रास दिला जात आहे. याबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले असून महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दीपाली सय्यद यांची मोदींवर टीका! - दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली होती. त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आलं होतं. त्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. दीपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, 'किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा... (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल", अशी टीका सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलताना केली होती.

हेही वाचा - Threats To Deepali Sayyad : 'मला जीवे मारण्याची धमकी, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार करणार' - दीपाली सय्यद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.