ETV Bharat / city

BJP Core Committee Meeting : भाजपकडून राज्यात पोल-खोल अभियान; प्रदेश कोअर कमिटीत निर्णय - BJP state core committee

भाजपची कोअर कमिटीची बैठक मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पार पडली. यामध्ये येत्या १५ एप्रिलपासून राज्यात पोल खोल अभियान कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक वार्ड मध्ये महा विकास आघाडी सरकारचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचे अशिष शेलार यांनी सांगितले.

आशिष शेलार
आशिष शेलार
author img

By

Published : Mar 31, 2022, 1:42 PM IST

मुंबई - भाजपची कोअर कमिटीची बैठक मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते उपस्थित होते. (BJP State Core Committee Meeting ) या बैठकीनंतर बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यात पोल-खोल अभियान सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.

भाजप आमदार आशिष शेलार पत्रकार परिषदेत बोलतना

१२ नेते ३६ जिल्याचा दौरा करणार - या बैठकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात रणनीती आणि जबाबदारी यांचे वाटप करण्यात आले. कोअर कमिटीचे महत्त्वाचे १२ नेते येणाऱ्या दिवसात १५ ते ३० एप्रिल दरम्यान 36 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये संपूर्ण आढावा घेऊन राज्यातील परिस्थितीचा अंदाज बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत जनतेबरोबर संपर्कात राहण्याच महत्त्वाचे काम भाजप नेत्यांना देण्यात आलेल आहे.

सरकारचे भ्रष्टाचार उघड करणार - मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमकपणे जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत अस आशिष शेलार म्हणाले आहेत. पोल-खोल अभियान सर्वसामान्य जनतेला तालुका स्तरापर्यंत न्याय देण्याचा आमचा मानस असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले आहे. येत्या १५ एप्रिलपासून राज्यात पोल खोल अभियान कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक वार्ड मध्ये महा विकास आघाडी सरकारचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचे अशिष शेलार यांनी सांगितले.

नाना पटोले चावीची गुडिया - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या अंतर्गत जे ठरले होते त्याप्रमाणे काम करण्याची आठवण करून दिली आहे. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, की नाना पटोले म्हणजे चावीची गुडिया आहेत. जोपर्यंत त्याला चावी दिलेली आहे तोपर्यंत ते बोलत राहतील. असा टोमणा आशिष शेलार यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.

हेही वाचा - फडणवीसांविरोधातील सर्व पुरावे लॅपटॉप आणि मोबाईल मध्ये, ईडीने तेच जप्त केले; शेखर उके यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.