ETV Bharat / city

Shiv Sena Vs BJP Controversy : सेना भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोप वर्चस्वासाठी; राजकीय विश्लेषकांचे मत

शिवसेना आणि भाजपा यांच्यामधील ( Shiv Sena and BJP allege allegations ) आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. मात्र यामुळे मुंबईकर नागरिकांना कोणताही फायदा होत नाही. त्यांची केवळ करमणूक होत आहे. महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा आटापिटा सुरु आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी दिली आहे.

शिवसेना भाजपा
शिवसेना भाजपा
author img

By

Published : Feb 18, 2022, 4:05 PM IST

Updated : Feb 18, 2022, 4:41 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ( Mumbai Municipal Corporation Election ) जसजशी जवळ येत आहे. तसतसे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा यांच्यामधील ( Shiv Sena and BJP allege allegations ) आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. मात्र यामुळे मुंबईकर नागरिकांना कोणताही फायदा होत नाही. त्यांची केवळ करमणूक होत आहे. महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा आटापिटा सुरु आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना पत्रकार श्रीरंग सुर्वे

'केवळ करमणूक होते आहे'

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याबाबत बोलताना, याचा नागरिकांना काहीही फायदा नाही, महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा आटापिटा सुरु आहे. हे दोन्ही पक्ष जेव्हा एकत्र होते तेव्हा यांना एकमेकांचे भ्रष्टाचार दिसले नाहीत. आता एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. यामुळे नागरिकांना कोणताही फायदा होत नाही. केवळ करमणूक होत आहे. यांना खरोखरच एकमेकांचे भ्रष्टाचार बाहेर काढायचे असतील तर कोर्टात पुरावे सादर करून प्रकरण तडीस नेईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. तरच जनतेला फायदा होईल. मुंबईमधील रस्ते, गटारे, मिठी नदीवर, कोस्टल रोडवर करोडो रुपये खर्च झाले. मात्र त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाह. यावर कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही. हे स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि झालेले आरोप परतवून लावण्यासाठी चर्चा सुरु आहे, अशी प्रतिक्रिया पालिकेतील वरिष्ठ पत्रकार श्रीरंग सुर्वे यांनी दिली आहे.

काय आहेत आरोप-प्रत्यारोप ?

भाजपाकडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कोविड काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे अलिबाग कोर्लई येथे १९ बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. तर शिवसेनेने किरीट सोमैया यांच्या मुलाच्या कंपनीत पीएनबी बँकेच्या भ्रष्टाचाराचे पैसे गुंतवले असल्याचा, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २५ हजार कोटींचा घोटाळा, सोमैया यांच्या मुलाने व मोहित कंबोज यांनी पीएनबी बँकेच्या भ्रष्टाचारातील पैसा, पत्रा चाळ पुनर्विकासात गुंतवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Allegation Kirit Somaiya : 'एक खुनी पुन्हा एकदा अलिबागच्या भूमीवर चाललाय,' राऊतांची सोमैयावर घणाघाती टीका

Last Updated : Feb 18, 2022, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.