ETV Bharat / city

Mahajev Jankar On Nawab Malik : नवाब मलिक यांच्या राजीनाम्याकरिता भाजपची घोषणाबाजी; तर महादेव जानकरांचे मौन

author img

By

Published : Mar 3, 2022, 3:15 PM IST

Updated : Mar 3, 2022, 3:44 PM IST

सभापतींच्या दालनासमोर येऊन विरोधकांनी गोंधळ ( BJP leaders slogans in assembly ) घातला. मलिक यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजपचे सर्वच मित्र पक्ष यात सहभागी झाले. मात्र, जानकर यांनी जागेवर बसून राहिले. त्यांनी भाजपच्या मागणीकडे कानाडोळा केला. जानकर यांच्या मौनव्रतामुळे सभागृहात उलटसुलट चर्चेला उधाण ( Mahadev Jankar keeps mum ) आले.

महादेव जानकर
महादेव जानकर

मुंबई- मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik arrest in money laundering ) यांचा देशद्रोही दाऊद इब्राहिमशी संबंध असून मंत्रीपदावरून त्यांची तात्काळ हाकलपट्टी करावी, अशी भाजपने जोरदार मागणी लावून ( BJP demand Nawab Malik resignation ) धरली. मित्रपक्ष असलेल्या सर्वच पक्षांनी भाजपला पाठिंबा दिला. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मौनव्रत धारण करत त्यांच्या मागणीकडे अप्रत्यक्ष दुर्लक्ष केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मनी लॉड्रींग प्रकरणी ईडीच्या अटकेत आहेत. दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांशी व्यवहार केल्यामुळे मंत्री नवाब मलिक हे कोठडीत असल्याचा आरोप भाजपने ( BJP on Nawab Malik arrest ) केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा विषय कोणत्याही नियमात बसत नाही, अशी समज देत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मागणी ( Ramraje Naike Nimbalkar on Malik arrest ) फेटाळून लावली आहे. यामुळे विरोधक संतप्त झाले.

हेही वाचा-CM Uddhav Thackeray on BJP : 'माझे 170 मोहरे फोडून दाखवाच'; मुख्यमंत्र्यांचे भाजपाला आव्हान

महादवे जानकर यांचे मौनव्रत

हेही वाचा-MLA Sanjay Daund Sheershasan : विधिमंडळासमोर राज्यपालांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आमदाराचे शीर्षासन, पाहा VIDEO

जानकर का आहेत नाराज?
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले रासपचे महादेव जानकर सध्या भाजपवर चांगलेच नाराज दिसत आहेत. पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि भाऊ म्हणून जानकर ओळखले जातात. पंकजा यांच्यावर भाजपकडून झालेल्या अन्यायामुळे ते अंतर राखून असल्याचे दिसून येतात. तर दुसरीकडे धनगर समाजाचे नेते, अशी ओळख असलेल्या जानकरांना डावलून फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना जवळ केले. त्यामुळे जानकर यांनी फडणवीस यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात जानकरांनी पडळकर यांनादेखील चिमटे काढले होते.

हेही वाचा-Nagraj Manjule on ETV Bharat : अमिताभ बच्चन सरांसोबत काम करणं स्वप्नापेक्षाही मोठं - दिग्दर्शक नागराज मंजूळे

Last Updated : Mar 3, 2022, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.