मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत ( Maharashtra Corona Cases Increased ) आहे. मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ ( Mumbai Corona And Omicron Cases Icreased ) होत आहे. राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली ( Maharashtra Minister And Mla Corona Positive ) आहे. त्यातच आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्याची ( Pravin Darekar Corona Positive ) माहिती दिली आहे.
-
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 5, 2022माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 5, 2022
ट्विट करत प्रवीण दरेकर म्हणाले की, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी."
2 जानेवारी रोजी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा विजय झाला होता. तेव्हा त्यांनी निवडणूकीत सहभाग घेतल्याने संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.
मंत्र्यांसह खासदार, आमदार कोरोनाबाधित
आतापर्यंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींना कोरोना संसर्ग झाला आहे. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे आमदारांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सागर मेघे, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, रोहित पवार, धीरज देशमुख, प्रताप सरनाईक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.