ETV Bharat / city

Atul Bhatkhalkar on Nawab Malik Arrest : 'नारायण राणे, नितेश राणे यांना अटक सूडबुद्धी नव्हती का?' - अतुल भातखळकर नवाब मलिक अटक प्रतिक्रिया

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक (ED Arrested Nawab Malik) केली आहे. यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांना अटक झाली तेव्हा सूडबुद्धी नव्हती का?, असा खोचक प्रश्न भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

Atul Bhatkhalkar
भाजप आमदार अतुल भातखळकर
author img

By

Published : Feb 23, 2022, 5:38 PM IST

Updated : Feb 23, 2022, 6:37 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक (ED Arrested Nawab Malik) केली आहे. यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांना अटक झाली तेव्हा सूडबुद्धी नव्हती का?, असा खोचक प्रश्न भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. तसेच मलिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून NCP आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल, बरेचजण गोत्यात येतील, असेही भातखळकर म्हणाले.

आमदार अतुल भातखळकर

मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी -

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. याविषयी बोलताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितल आहे की, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयासमोर आंदोलन करतात याचा अर्थ महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही? तसेच नवाब मलिक यांच्या संदर्भामध्ये शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे तेसुद्धा स्पष्ट करणे गरजेचे आहे. जर त्यांना काही आपत्ती असेल तर त्यांनी न्यायालयात जायला हवं. मुंबई शहराची बर्बादी करणाऱ्या दाऊदबरोबर नवाब मलिक यांचे संबंध आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काय हे महाराष्ट्राच्या, मुंबईच्या जनतेला समजायला पाहिजे, असेही भातखळकर म्हणाले.

सत्य एकेक करून समोर येईल -

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांना मागे अटक झाली ती सूडबुद्धी नव्हती का? असा प्रश्नही भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांचा दामन पूर्णपणे काळ असून शरद पवारांना हे अपेक्षितच होतं, तर मग शरद पवार न्यायालयात का नाही गेले. तर त्यांना हे सर्व माहिती होतं, त्यांनी उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत असे सांगत आता नवाब मलिक यांचे संबंध उघड झाले आहेत, म्हणून नको ती भाषा आता ते बोलत आहेत. सत्य एकेक करून समोर येत आहे. आणखी सत्य समोर येणार आहे, असेही भातखळकर म्हणाले.

राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर येणार -

नवाब मलिक यांना झालेली अटक ही योग्य दिशेने उचललेले पाऊल असल्याची पुष्टीही अतुल भातखळकर यांनी दिली. दाऊदबरोबर नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध आता पुराव्यानिशी सिद्ध झाले असल्याकारणाने हे सर्व घडले आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या आता कुठल्या इतर नेत्याचे नाव या प्रकरणांमध्ये समोर येते तेही आता बघावे लागणार आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीचा खरा चेहरा आता जनतेसमोर उघड होणार असल्याचेही भातखळकर यांनी सांगितले.

Last Updated : Feb 23, 2022, 6:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.