ETV Bharat / city

२६/११ terrorist attack मनीष तिवारी यांचा कबुलीजबाब तत्कालीन यूपीए सरकारकरिता दुर्भाग्यपूर्ण-राम कदम

मनीष तिवारी यांनी युपीए सरकारवर निशाणा साधल्यानंतर भाजपला आयते कोलित भेटले आहे. यावर भाष्य करताना भाजप नेते राम कदम यांनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर हल्लाबोल केला आहे. २६/११ हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याऐवजी मनमोहन सिंग सरकार हातावर हात ठेवून बघत राहिले.

राम कदम
राम कदम
author img

By

Published : Nov 23, 2021, 4:56 PM IST

मुंबई- काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून भाजपने काँग्रेस सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी सत्तेत असलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारवर कडक शब्दात सुरक्षेच्या मुद्यावरून ताशेरे ओढले आहेत. २६/११ दहशतवादी हल्ल्यावर आधारित या पुस्तकात भाष्य करण्यात आलेले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी (congress leader Manish Tiwari) यांनी युपीए सरकारवर निशाणा साधल्यानंतर भाजपला आयते कोलित भेटले आहे. यावर भाष्य करताना भाजप नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर हल्लाबोल केला आहे. २६/११ हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याऐवजी मनमोहन सिंग सरकार हातावर हात ठेवून बघत राहिले. मनीष तिवारी यांनी आता हे स्वतःहून स्वीकार केले आहे. २६/११ हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकार पूर्णपणे पाकिस्तानला उत्तर देण्यास अपयशी ठरले, हे फार दुर्भाग्यपूर्ण आहे. मनीष तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या हायकमांडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, असेही राम कदम म्हणाले.

हेही वाचा-विरारमध्ये 'जय भीम'ची पुनरावृत्ती; पोटाची खळगी भरणाऱ्या आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांची मारहाण

१८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथे हल्ला झाला. मोदी सरकारने १० दिवसातच पाकिस्तानला त्याचे प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा हल्ला झाला. त्याचे उत्तरही बारा दिवसात देण्यात आले. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे उत्तम काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असे, भाजप नेते कदम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-पहाटेचा शपथविधी : ऐका, 'त्या' शपथविधीविषयी काय बोलून गेले अब्दुल सत्तार!

२६/११ चा दहशतवादी आतंकी हमला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करायला हवी होती. परंतु त्यांनी ती कारवाई केली नाही. यावर भारत सरकारचा दुबळेपणा दिसून आला. त्याचबरोबर पाकिस्तान निर्दोष व्यक्तींचे रक्त सांडत असताना सरकारला त्याचे दुःख झालं नाही. तेव्हा गप्प राहून संयम दाखवणे ही ताकद नाही. उलट कमजोरपणाचे लक्षण आहे, असेही मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-Bulgaria Bus crash : बल्गेरियात अपघातानंतर बस पेटली, 45 ठार

10 FLASH POINTS: "20 YEARS NATIONAL SECURITY SITUATIONS THAT IMPACTED INDIA" असे मनीष तिवारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये सुद्धा लिहिले, की हे पुस्तक यूपीए सरकारच्या दोन दशकात काही प्रसंगी मौन धारण करण्यावर आहे.

काय आहे पुस्तकात?

मनीष तिवारींनी २६/११ ची तुलना अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याबरोबर केली आहे. ९/११ अमेरिकेचीस दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये पाय ठेवत तिथली भूमी बॉम्बस्फोटाने हादरून टाकली होती. परंतु भारत सरकार २६/११ च्या हल्ल्यानंतर गप्प राहिले. इतकेच नाही तर भारतीय वायुसेना पाकिस्तानवर हल्ला करू इच्छित होती. पण यूपीए सरकारने त्यांना परवानगी दिली नाही, असा आरोपही मनीष तिवारी यांनी केला आहे.

26/11 च्या हल्ल्यानंतर काँग्रेसवर झाली होती टीका-

मुंबई हल्ल्यानंतर काँग्रेसची फजिती झाली होती. तेव्हाचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यावरही आरोप लावण्यात आले होते. एकीकडे मुंबई पेटत असताना शिवराज पाटील कपडे बदलण्यात व विविध कार्यक्रमात हजेरी लावण्यात व्यस्त होते, असा उल्लेख या पुस्तकात केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.