मुंबई - १० जूनच्या राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच राजकीय पक्ष रस्सीखेच करताना दिसत आहेत. अशातच निवडणुकीला आता फक्त २ दिवस राहिल्या कारणाने शिवसेनेने उभा केलेला दुसरा उमेदवार संजय पवार व भाजपाने उभा केलेला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांना जिंकून आणण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपा यांच्यात अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेना ( Shiv sena ) सध्या भांबावलेल्या अवस्थेत आहे. त्यांनी दुसरा उमेदवार दिल्याने ते स्वतः संभ्रमित झाले आहेत. हा उमेदवार देताना त्यांनी कुठल्याही पद्धतीचा विचार केला नाही. त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास राहिलेला नसल्या कारणाने त्यांना आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे, अशी टीका विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर ( Bjp Leader Praveen Darekar ) यांनी केली आहे.
'आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणे हा घोडेबाजार' : १० जून च्या निवडणुकीसाठी आमदारांची मते फुटू नयेत यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार काल ( सोमवारी ) मुंबईत दाखल झाले. कालचा मुक्काम त्यांनी मुंबईतील मालाड येथील हॉटेल रिट्रीट मध्ये केल्यानंतर आज त्यांना त्या हॉटेलमधून दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहे. एका रात्रीतच हॉटेल बदलण्याची वेळ शिवसेनेच्या आमदारांवर आली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यावर बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते, प्रवीण दरेकर यांनी सांगितल आहे की, शिवसेना सध्या भांबावलेल्या अवस्थेत आहे. त्यांनी दुसरा उमेदवार दिल्याने ते स्वतः संभ्रमित झाले आहेत. हा उमेदवार देताना त्यांनी कुठल्याही पद्धतीचा विचार केला नाही. त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास राहिलेला नसल्या कारणाने त्यांना आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. चार ते पाच दिवस फाइव स्टार हॉटेलला आमदार ठेवणे म्हणजे हा घोडेबाजार नाहीतर काय आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अडीच वर्षांमध्ये सरकारने काहीच काम केले नाही आहे. ते सर्व जनतेला माहित आहे. सरकार काम करते याचे प्रतिबिंब जनतेमध्ये उमटत असते. परंतु या सरकारमध्ये स्थिरता नाही आहे. महाविकास आघाडी सरकार सर्व क्षेत्रात पूर्णपणे अपयशी झालेल असून या आघाडीचे मंत्री बच्चू कडू असे सांगतात की, आम्हाला गृहीत धरू नका. यावरून सर्वांना माहीत झालेल आहे की आघाडीमध्येच बिघाडी आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.
'आमची रणनीती ठरली आहे' : आमचा तिसरा उमेदवार धनंजय महाडिक हे नक्कीच विजयी होणार यात काही शंका नाही. कारण आम्ही उमेदवार दिला त्या वेळेसच त्या अगोदर त्याची रणनीती आखली होती. तशा पद्धतीने नियोजन केले होते. आम्ही जी काही रणनीती आखली आहे ती सांगायची नसते. परंतु वरातीमागून घोडे नाचवायची आम्हाला सवय नाही, असेही ते म्हणाले. याउलट शिवसेनेने मागेपुढे न बघता दुसरा उमेदवार दिला आहे व आता त्यांचा उमेदवार त्यांनाच अडचणीचा ठरला आहे, असेही दरेकर म्हणाले.
हेही वाचा - Sanjay Raut on BJP : 'तुमचे ते गेट टू गेदर आणि आम्ही... मूर्ख लोकं आहेत ही'; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीका