ETV Bharat / city

'राज्याला आर्थिक संकटात आणि दारिद्र्यात लोटण्याचे काम सरकारकडून सुरू' - Narayan Rane Slammed MH gov over corona spread

खासदार नारायण राणे म्हणाले की, वेगाने लसीकरण करण्यासाठी तसेच रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध करून देण्यासाठी या सरकारकडे नियोजन नसल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. 'नियम पाळा नाहीतर लॉकडाऊन लावू' अशी धमकीच हे सरकार वारंवार देत आहे.

खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषद
खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषद
author img

By

Published : Apr 2, 2021, 8:23 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबई महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. परिणामी राज्यातील आरोग्य व्यवस्था ही वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी अपुरी आहे. या सगळ्या प्रकरणावर भाजपने या महाविकास आघाडी सरकारला घेरलेले असताना भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठल्याची टीका पत्रकार परिषदेत केली आहे.

खासदार नारायण राणे म्हणाले की, वेगाने लसीकरण करण्यासाठी तसेच रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध करून देण्यासाठी या सरकारकडे नियोजन नसल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. 'नियम पाळा नाहीतर लॉकडाऊन लावू' अशी धमकीच हे सरकार वारंवार देत आहे. पण या लॉकडाऊनमुळे समाजातील विविध घटकांचे किती मोठे नुकसान होणार आहे, याची मुख्यमंत्र्यांना कल्पना नाही. घराबाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेच्या वेदना कशा कळणार, असा सवाल या वेळेस पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उपस्थित केला.

'राज्याला आर्थिक संकटात आणि दारिद्र्यात लोटण्याचे काम सरकारकडून सुरू

हेही वाचा-स्टेट बँकेकडून देखभालीचे काम; डिजीटल सेवा विस्कळित झाल्याने ग्राहक त्रस्त

प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार-
पुढे राणे म्हणाले की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पाठविलेल्या पत्रावरूनच सत्ताधारी जनतेकडून पैसे वसूल करत असल्याचे दिसत आहे. राज्यात कोरोना आणि गुन्हेगारी सोबतच भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हे सध्या आपल्या सगळ्यांनाच दिसून येत आहे. प्रत्येक खात्यामध्ये, प्रत्येक निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागेपासून ते विविध विभागाच्या परवानग्या मिळविण्यासाठी माजी मुख्यमंत्री असताना सर्वाधिक मेहनत देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मात्र आघाडी सरकारने स्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रण दिले नाही. त्यात त्यांनी आपल्या संकुचितपणाचे लक्षण दाखवलेले आहे, अशी टीकाही राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा-सलमान खानची चिंगारीमध्ये गुंतवणूक; ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही करणार काम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.