मुंबई - भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैया यांच्यावर शनिवारी (दि. 23 एप्रिल) रात्री खार पोलीस ठाण्याजवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याचा ( Attack on Kirit Somaiya ) तपास सीबीआयकडे ( CBI Investigation ) देण्यात यावा यासाठी आज (दि. 28 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी यासाठी सोमवारी (दि. 2 मे) लेखी अर्ज करणार असल्याची माहिती किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी दिली आहे.
भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांची उच्च न्यायालयात याचिका आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका किरीट सोमैया यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. किरीट सोमैया यांनी दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये राज्य सरकार, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, खार पोलीस ठाण्याचे अधिकारी मोहन माने, वांद्रे पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेश शांताराम देवरे आणि सीबीआय यांच्यासह इतर विरोधात याचिकेत प्रतिवादी पक्ष करण्यात आले आहे.
या याचिकेत सोमैया यांनी त्यांच्यावर अलीकडच्या काळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा व त्या अनुषंगाने पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे. याचिकेत म्हटले आहे की, खार पोलीस ठाण्यात आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आपण वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल गेलो होतो. माझे म्हणणे नोंदवून घेतल्यावर पोलीस निरीक्षक राजेश शांताराम देवरे यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा बनावट एफआयआर दाखल केला. या एफआयआर विरोधात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार दाखल केली. याबाबत आपण राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्याची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवावा, असेही डॉ. सोमैया यांनी याचिकेत नमूद केले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut on Kirit Somaiya : तो माथेफिरू हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून येतो आणि.. संजय राऊतांचा सोमैयांना टोला