मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी भाजपा आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी त्याचे कुटुंबीय व सर्वांकडून होत असताना सरकार ते द्यायला तयार नाही. सगळ्या यंत्रणा तपास करत असताना तो सरकारकडून रोखल जातोय, असा आरोप भाजपा किरीट सोमय्या यांनी केला आहे. सगळ्या यंत्रणांना तपास करू द्या, जलद गतीने तपास करा, अशी विनंती पोलीस व राज्यसरकारला सोमैयांनी केली आहे.
सुशांतसिंहच्या आत्महत्येला चाळीस दिवस उलटून गेले आहेत. तपास जलदगतीने हो नसल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केलाय. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपास सुरू असताना ठाकरे सरकार पालिका आयुक्त पोलीस आयुक्त यांच्याद्वारे रोखण्याचा प्रयत्न करत आहे. यांचा आम्हाला खेद आहे. सर्व यंत्रणांना या प्रकरणाचा तपास करू द्या, अशी विनंती भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आज सरकारला केली आहे.
मागील अनेक दिवसांपासून सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकार तपास सीबीआयकडे द्यायला तयार नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर सर्वत्र शंका उपस्थित केली जात आहे. काल बिहारहून सुशांतसिंह प्रकरणाच्या तपास करायला आलेल्या एका अधिकाऱ्याला पालिकेकडून क्वारंन्टाइन करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण अधिकच तापले. महाराष्ट्र सरकार यामध्ये लक्ष देत नाही. जलद गतीने तपास करत नाही. असं कालपासून काही इतर राज्यातील नेते तसेच महाराष्ट्र विरोधी पक्षदेखील आरोप करत याची तपासणी वेगवेगळ्या यंत्रणांकडून जलद गतीने व्हावी, अशी मागणी करत आहेत.
'सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तपास रोखला जातोय' - kirit somaiya on sushant singh rajput
सगळ्या यंत्रणा तपास करत असताना तो सरकारकडून रोखल जातोय, असा आरोप भाजपा किरीट सोमय्या यांनी केला आहे. सगळ्या यंत्रणांना तपास करू द्या, जलद गतीने तपास करा, अशी विनंती पोलीस व राज्यसरकारला सोमैयांनी केली आहे.
!['सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तपास रोखला जातोय' kirit somaiya news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8288934-866-8288934-1596543267594.jpg?imwidth=3840)