ETV Bharat / city

Kiriti Somaiya : शिंदे गटातील भ्रष्टाचारी नेत्यांची नावे घेताच सोमैयांची चुप्पी; राऊत, परबांना इशारा

परब ( Anil Parab ) यांचे रिसॉर्ट आणि राऊत ( Sanjay Raut ) यांचे पत्रा चाळ प्रकरण त्यांना नक्कीच भोवणार आहे. मात्र, शिंदे गटातील या दोन आमदारांवर कारवाई करणार का ( Shinde Group Corrupt MLA ) असे विचारताच, किरीट सोमैयांनी ( Kirit Somaiya ) त्यांचे नाव घेण्याचे टाळले.

Kiriti Somaiya
Kiriti Somaiya
author img

By

Published : Jul 7, 2022, 3:33 PM IST

मुंबई - भ्रष्टाचारी नेत्यांविरोधात आपण पुकारलेली लढाई ही सुरूच राहणार आहे. काही झाले तरी आपण भ्रष्टाचारी नेत्यांनी विरोधातला पाठपुरावा करत राहू, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत माजी खासदार किरीट सोमैया यांनी शिंदे गटाला धक्का दिला आहे. किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

"राऊतांना पत्रा चाळ प्रकरण भोवणार" - किरीट सोमैया म्हणाले की, शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब ( Anil Parab ) आणि संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावरील कारवाईचा पाठपुरावा सातत्याने करू. परब यांचे रिसॉर्ट आणि राऊत यांचे पत्रा चाळ प्रकरण त्यांना नक्कीच भोवणार आहे. त्यामुळे आपण या प्रकारांचा सातत्याने पाठपुरावा करू.

किरीट सोमैया प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

"सरनाईक जाधव यांच्या प्रकरणांचाही पाठपुरावा" - दरम्यान, शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांनी सत्तेमध्ये सहभागी होत भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोन आमदारांवर कारवाई करणार ( Shinde Group Corrupt MLA ) का असे विचारताच, किरीट सोमैयांनी त्यांचे नाव घेण्याचे टाळले. मात्र, ज्या भ्रष्टाचारी नेत्यांविरोधात यापूर्वी कारवाई करण्याची मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा केला आहे. त्या भ्रष्टाचारी नेत्यांनी विरोधात कारवाई केली जाईल. त्यात कोणतीही माघार घेणार नाही, असे सोमैयांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'संदीपान भूमरेंनी मंत्री झाल्यावर माझ्यासमोर लोटांगण घातलं.. CCTV फुटेज देतो - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.