मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी मारहाण करून मुंडन केलेल्या तरुणाची मंगळवारी भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या नेत्यांनी भेट घेतली. त्यामुळे या वादात आता भाजपने उडी घेतल्यास शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा... पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि रामनाथ कोविंद यांनी वाहिली वाजपेयींना आदरांजली
दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाणीची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. यावर हिरामण तिवारी या युवकाने फेसबुकवर पोस्ट टाकून आक्षेप घेतला होता. याचा राग मनात धरून शिवसैनिकांनी रविवारी हिरामणला मारहाण केली. तसेच त्याचे मुंडनही केले होते.
हेही वाचा... 'नॉत्रे डेम कॅथेड्रल'मध्ये २१३ वर्षांमध्ये पहिल्यांदाच नाही साजरा होणार नाताळ!
शिवसैनिकांनी केलेल्या या कृत्याबाबत वादाला तृक टर्मिनस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आता या घटनेला राजकीय वळण मिळताना दिसत आहे. माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या नेतृत्वात भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाने, मंगळवारी हिरामण तिवारी याची भेट घेतली यावेळी त्याला कायदेशीर मदत देण्याचा विचारही बोलून दाखवला. एकूणच सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट आले असताना, आता मारहाणीचे हे प्रकरण अधिक चिघळणार असे दिसत आहे.
हेही वाचा... महात्मा फुले कर्ज माफीसाठी राज्य सरकारवर 30 हजार कोटींचा बोजा