मुंबई - रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांच्या खात्यातून आरटीजीएसने पैसे पाठवले, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मात्र ते बंगले नसल्याचे सांगत असतील तर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी कर का भरला असा सवाल भाजपनेते किरीट सोमैया यांनी आज केला. यावेळी त्यांनी संजय राऊत हे पुरावे नसताना आरोप करत आहेत. त्यामुळे कागदपत्रांशिवाय आरोप करणाऱ्यांना पुरावा विचारा असा सल्लाही त्यांनी यावेळी माध्यमांना दिला.
भाजपनेते किरीट सोमैया यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबत आज सोमैया यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता, राऊत आरोप करतात. मात्र त्यांच्याकडे पुरावे आहेत का असा सवाल त्यांनी केला. रश्मी ठाकरे यांनी आरटीजीएसने कर भरल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचेही ते म्हणाले.