ETV Bharat / city

'खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांना लुटण्यासाठी सरकारने दिलेत अधिकार, लूट थांबवायला हवी'

खासगी रुग्णालयामार्फत करोनाबाधित रुग्णांकडून आवाच्यासव्वा शुल्क आकारण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार रुग्णांनीच समोर आणला. राज्य सरकार सर्व पालिका व खासगी रुग्णालय आपल्या ताब्यात घेत कोरोना रुग्णांसाठी सोयीसुविधा देत असल्याचे सांगत आहे. मात्र, प्रशासनाच्या हद्दीतील खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करत आहेत. सरकारने दिलेल्या अधिकारावरुन सुरू असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Mumbai
किरीट सोमय्या, भाजपनेते
author img

By

Published : Jun 22, 2020, 3:51 PM IST

Updated : Jun 22, 2020, 4:09 PM IST

मुंबई - शहरातील क्षेत्रातील कोविड-१९ सुविधा उभारलेल्या खासगी रुग्णालयामार्फत करोनाबाधित रुग्णांकडून आवाच्यासव्वा शुल्क आकारण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार रुग्णांनीच समोर आणला. राज्य सरकार सर्व पालिका व खासगी रुग्णालय आपल्या ताब्यात घेत कोरोना रुग्णांसाठी सोयीसुविधा देत असल्याचे सांगत आहे. मात्र प्रशासनाच्या हद्दीतील खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करत आहेत. सरकारने दिलेल्या अधिकारावरुन सुरू असलेली ही लूट थांबायला हवी. या लुटीवर कारवाई करायला हवी, अशी मागणी भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या, भाजपनेते

शहरातील महापालिकेने करोना रुग्णांवरील उपचारासाठी विविध ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत. या ठिकाणी नि:शुल्क उपचार करण्यात येत आहेत असे सांगितले जात आहे. मात्र मुंबई व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाने कोविड-१९ साठी अधिग्रहित केलेल्या खासगी रुग्णालयातर्फे उपचारासाठी दाखल केलेल्या करोनाबाधित रुग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारले जात आहे.

Mumbai
बील

खासगी रुग्णालयात सरासरी बिल 5 लाख ते 10 लाख आकारण्यात येत आहे. त्यात पीपीई किट्स, हँडग्लोव्हज, डॉक्टर, नर्स सुपरव्हिझन, सीओव्हीआयडी, आयसीयू, बायोवेस्ट मॅनेजमेंट चार्ज आणि इतर यासारखे असामान्य शुल्क खासगी रुग्णालांकडून आकारण्यात येत आहेत.

Mumbai
पत्र

धक्कादायक म्हणजे काही रुग्णालये अधिभार म्हणून बिल रकमेच्या 10 टक्के जमा व शुल्क आकारत आहेत. ते रुग्णांच्या खिशातून जात आहे. अशा अनेक खासगी रुग्णालयातील लुटीच्या तक्रारी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे रुग्णांनी केलेल्या आहेत. यामध्ये नुकताच डी. वाय. पाटील रुग्णालयातील एका रुग्णाचे बिल त्यांनी दाखवत खासगी रुग्णालयांकडून कशाप्रकारे सामान्य रुग्णालयाची लूट होत आहे, हे त्यांनी दाखवले. महाराष्ट्र सरकारने कोविड रूग्णांना लुटण्यासाठी खासगी रुग्णालयांना अधिकार दिलेले आहेत. त्याप्रकारे ते लूट करत आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. खासगी रुग्णालयाची होणारी लूट थांबवायला हवी, यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

Last Updated : Jun 22, 2020, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.