ETV Bharat / city

भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना नेत्यांची पाठराखण - किरीट सोमैया - मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांची पाठराखण करत आहे

अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जातात आणि नार्वेकर यांच्या बंगल्यावर अनिल परब जातात. या दोघांची काळजी घेण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतात, असा गंभीर आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

किरीट सोमैया
किरीट सोमैया
author img

By

Published : Jun 25, 2021, 4:12 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मंत्री अनिल परब हे रिसॉर्ट बांधत होते, तर मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी बंगला बांधला होता. मिलिंद नार्वेकर यांनी साडेचारशे झाडे कापून बंगला उभारण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव आहेत, तर अनिल परब अनिल परब हे परिवहन मंत्री आहेत. दापोलीतल्या मुरुड समुद्र किनारी अनिल परब यांच्या साई रिसॉर्टच्या बाजूला मिलिंद नार्वेकर यांची जागा आहे. त्या जागेवर मिलिंद नार्वेकर यांनी साडेचारशे झाडे कापून बंगला उभारण्याचा काम सुरू केला आहे. दोघांनी कुठल्याही विभागाची परवानगी न घेता हे बांधकाम केले आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला आहे.

मुख्यमंत्र्यांवर केले विविध आरोप

अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जातात आणि नार्वेकर यांच्या बंगल्यावर अनिल परब जातात. या दोघांची काळजी घेण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतात, असा गंभीर आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. दापोली-मुरुड येथे अनिल परब आणि अलिबाग-मुरुड येथे रवींद्र वायकर यांचे बंगले आहेत. शिवसेना ही आत्ता बंगलो सेना झाली असून या सगळ्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी सोमैया यांनी केली आहे. तर अनिल देशमुख हे छगन भुजबळ यांच्या मार्गावर आहेत त्यांनी वाझेंकडून मिळवलेला पैसा कलकत्त्याच्या कंपनीत वळवला आणि त्या काळ्या पैशामुळे अनिल देशमुख कधी जेलमध्ये जाणार याची उत्सुकता आता जनतेला लागलेली आहे, असेही ते म्हणाले. शिवाय माजी मंत्री अनिल देशमुखनंतर आत्ताचे मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे. अनिल परब यांच्या आर्थिक व्यवहाराची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्यात यावी, यासाठी मी स्वतः आठशे पानाची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये क्लिनचिट देण्याची हिंमत असेल, तर वायकर आणि नार्वेकर यांच्या बंगल्यांना क्लिनचिट द्या, असे आव्हान देखील यावेळी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केले आहे.

हेही वाचा -'मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजप नेत्यांनी उचलला आहे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.