ETV Bharat / city

नरेंद्र मोदी व चंद्रकांत पाटील हे महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे – अतुल लोंढे

राज्यात सध्या हिंदू व हिंदूत्वाच्या मुद्द्यावर राजकारण पेटताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदूत्व यांच्यातील स्पष्टीकरण दिल्यानंतर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. या कारणावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

author img

By

Published : Dec 15, 2021, 9:06 PM IST

bjp-leader-chandrakant-patil
bjp-leader-chandrakant-patil

मुंबई - राज्यात सध्या हिंदू व हिंदूत्वाच्या मुद्द्यावर राजकारण पेटताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदूत्व यांच्यातील स्पष्टीकरण दिल्यानंतर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. या कारणावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील जनता मोदी यांची तुलना कदापि छत्रपती शिवाजी महाराजांशी सहन करणार नाही, असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे चंद्रकांत पाटील आणि नरेंद्र मोदी आहेत. महाराजांचे राज्य जाती-पाती, धर्माच्या पलिकडले होते. स्त्री सन्मान करणारे रयतेचे राजे शिवाजी महाराज होते. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी हे मुठभर लोकांना राष्ट्राची संपत्ती विकणारे आहेत. ८० करोड पेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेखाली नेणारे मोदी आहेत, म्हणून महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना मोदींशी कदापी सहन करणार नाहीत, असे लोंढे म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटलांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने वादला सुरुवात
प्रवीण दरेकर पाटलांच्या समर्थनार्थ -
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना टीकेचे धनी बनवले असताना पाटील यांच्या समर्थनार्थ आता प्रवीण दरेकर पुढे आलेले आहेत. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य शब्दशः घेऊ नका, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन जाणारे हिंदुत्व असा त्यांना सांगायचं होतं, असं प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनाच्या मुखपृष्ठ असलेल्या सामना या अग्रलेखातून सुद्धा ताशेरे ओढण्यात आलेले आहेत.

हे ही वाचा - Chandrakant Patil Statement : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केली, मोदींनी त्यावर कळस चढवला'

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

“तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या निवडणूक तिकिटांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा रोख हिंदू व्होटबँकेपर्यंत नेला. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवला' असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.