ETV Bharat / city

राज्यातील सरकार कायद्याने नाही, तर राजकीय वायद्याने काम करते; आशिष शेलारांची टीका

author img

By

Published : Jan 9, 2020, 8:45 PM IST

जस्टीस लोया प्रकरणाचा तपास आणि चौकशी पुर्ण झाली आहे. तरीही राज्य सरकार त्याचे पुरावे गोळा करण्याचा उद्योग करत आहे. हा प्रकार पाहता, हे सरकार कायद्याने नाही, तर राजकीय वायद्याने चालत असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली.

Ashish Shelar
आशिष शेलार

मुंबई - सीबीआय विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. यावर बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका...

हेही वाचा... संपादक कसे असावे? यासाठी संजय राऊतांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रवेश घ्यावा

'फ्री काश्मीर फलक प्रकरणात चालढकल करणारे सरकार, बंद झालेल्या जस्टीस लोया प्रकरणाचा पुन्हा तपास करू म्हणत आहे. त्यामुळे हे सरकार आता कायद्याने नाही तर राजकीय वायद्याने चालत असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

हेही वाचा... जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी - गृहमंत्री अनिल देशमुख

काय म्हणाले आशिष शेलार....

  • ज्या पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केले आहे. ते पाहता महाराष्ट्राचे गृहमंत्री तथ्य आणि कायद्याच्या आधारे कारभार न करता राजकारण करून कारभार करत आहे.
  • फ्री काश्मीर प्रकरणात, ती मुलगी हातात 'फ्री काश्मिर' असा बोर्ड घेऊन उभी राहते. हा सरळ उघड प्रकार असतानाही, त्या केसची रिव्ह्यू घेऊ असे गृहमंत्री सांगतात. हा प्रकार प्रकरण दडपण्याचा असल्याचा शेलार यांनी म्हटले.
  • ज्या जस्टीस लोया केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल पूर्वीच दिला आहे. त्या केसमध्ये राज्य सरकार पुन्हा चौकशी करू, असे बोलत आहे. हे पाहता सरकार फक्त राजकीय वायद्याचा विचार करताना दिसत आहे.
  • महाराष्ट्राचे सरकार हे सध्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम करत आहेत. अनेक प्रकल्पांचे रिव्हू घेऊन ते प्रकल्प बंद करत आहेत.
  • फ्री काश्मीर सारख्या केसमध्येही राज्य सरकार गडबड करत आहे. अशा तक्रारींचा सुद्धा रिव्हू घेऊन त्या बंद करण्याचा घाट आहे. एका बाजूला पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला पुराव्यांशी छेडछाड केली जात आहे.

त्यामुळे हे सर्व प्रकार पाहता. हे सरकार कायद्याने नाही तर राजकीय वायद्याने चालत आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर केली.

हेही वाचा... 'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबरच चिंतामुक्तही करणार'

Intro:फ्लॅश

ज्या पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केले आहे

ते पाहता महाराष्ट्राचे गृहमंत्री फॅक्टच्या आणि कायद्याच्या आधारे कारभार न करता राजकारण करून कारभार करत आहे

एका केस मध्ये एक मुलगी हातात फ्री काश्मिर असा बोर्ड घेऊन उभी राहते त्या केसची रिव्ह्यू घेऊ असे सांगतात

तर ज्या जज लोया केस मध्ये सुप्रिम कोर्टाने निकाल दिला आहे त्या केस मध्ये पुन्हा चौकशी करू असे म्हणने म्हणजे केवळ या गोष्टीला राजकारण म्हणून पाहने....

महाराष्ट्राचे सरकार हे प्रकल्पांची रिव्हू घेऊन प्रकल्प बंद करत आहेत आणि राज्यात असलेल्या तक्रारींचा सुद्धा हे रिव्हू घेऊन बंद केल्या जात आहे....

एका बाजूला पोलीसांवर दबाव टाकला जात आहे तर दुसऱ्या बाजूला पुराव्यांशी छेडछाड केली जात आहे.....

*हे सरकार कायद्याने नाही तर राजकीय वायद्याने चालत आहे..*Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.