मुंबई - येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या २ए आणि मेट्रो ७ च्या टप्प्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या आहेत. या प्रकल्पाचे ६० टक्क्यांहून अधिक काम देवेंद्र फडणीस सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहे. तरीही असतानाही मुंबईकरांना वेठीस धरून उर्वरित कामास तब्बल तीन वर्षे विलंब लावल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो रेल्वेच्या २ ए आणि मेट्रो ७ टप्प्यांचे उद्घाटन म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या- केशव उपाध्ये - भाजप प्रदेश कार्यालय
गेल्यावर्षी ३१ मे रोजी या मार्गावरील मेट्रो रेल्वेची चाचणी पूर्ण झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर अपुऱ्या सुविधानिशी मेट्रो सुरू करणारे ठाकरे सरकार म्हणजे आयत्या उभारलेल्या गुढीची पूजा करण्यासाठी उपटलेला अनाहूत यजमान आहे, अशी बोचरी टीकाही उपाध्ये यांनी याप्रसंगी केली.