ETV Bharat / city

NCP Allegation: शिंदे समर्थकांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा ? राष्ट्रवादीचा आरोप

author img

By

Published : Sep 30, 2022, 10:58 PM IST

NCP Allegation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांचा ठाण्यातील माजीवाडा मतदार संघावरून वाद झाला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू Discussions started in political circles असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे गटात मतदारसंघावरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे.

NCP Allegation
NCP Allegation

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांचा ठाण्यातील माजीवाडा मतदार संघावरून वाद झाला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू Discussions started in political circles असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे गटात मतदारसंघावरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे.

दबाव टाकत असल्याचा दावा ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ हे मतदार संघ एकनाथ शिंदे गटाकडे असूनही या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा डोळा असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे. तसेच या मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकत असल्याचा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचा आरोप ओवळा माजीवाडा मतदारसंघ बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांचा आहे. मात्र हा आणि इतर दोन मतदारसंघ भाजपला हवे असून त्यादृष्टीने भाजप रणनीती आखत आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या तिन्ही मतदारसंघात भाजपचे मेळावे घेतले होते. त्याचवेळी कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप डोळा असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ हे तिन्ही मतदारसंघ भाजपला हवे असून त्यात प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघाची डील झाल्याने एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांच्यात धुसफूस सुरू आहे. शिवसेनेशी गद्दारी करुन भाजपसोबत संसार थाटलेल्या एकनाथ शिंदे व त्यांच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघावर भाजपची वक्रदृष्टी पडली असल्याने ही धुसफूस वाढत जाणार जाईल. शिवाय शिवसेना सोडून चूक केली, असा पश्चाताप त्या आमदारांना करावा लागणार आहे, असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.