मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई केल्यानंतर मुंबईतील इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई का नाही, असा प्रश्न भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे मंत्री अनिल परब यांनी वांद्रे येथील आपल्या कार्यालयासमोर अनधिकृत बांधकाम केले आहे. या बांधकामाची तक्रार करूनही म्हाडा प्रशासन कारवाई करत नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा - भाजपाची मागणी - अभिनेत्री कंगना रणौत कारवाई न्यूज
मंत्री अनिल परब यांनी वांद्र्यातील आपल्या कार्यालयासमोर अनधिकृत बांधकाम केले आहे. याची तक्रार करूनही म्हाडा प्रशासन कारवाई करत नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले. याची तक्रार 2019मध्येच केली असून परब यांनी याबाबत उत्तर दिलेले नाही. या बांधकामाच्या सध्याच्या स्थितीविषयी अधिक माहिती द्यावी, असे पत्र त्यांनी म्हाडाला दिले आहे. कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर पालिकेने कारवाई केली, अशीच कारवाई परब यांच्या बांधकामावर होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.