ETV Bharat / city

भाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले - नाना पटोले

author img

By

Published : Oct 28, 2021, 7:15 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरु आहे. सर्व काही खाजगीकरण करुन आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. मुंबईत टिळक भवन येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात नाना पटोले बोलत होते.

BJP defames Ambedkar movement by calling it Naxalite - Nana Patole
भाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले - नाना पटोले

मुंबई - केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरचे अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

  • सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळा -

मुंबईत टिळक भवन येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे, हेमंत ओगले, अमर खानापुरे, शिवानी वडेट्टीवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 'बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश वाचेल'

यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरु आहे. सर्व काही खाजगीकरण करुन आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे. बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश वाचेल त्यासाठी आंबेडकरांचा विचार, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवा. देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी जोमाने काम करा, असे आव्हान पटोले यांनी केले.

  • काँग्रेस संधी देते - वडेट्टीवार

काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये संधी मिळेत हेच सिद्धार्थ यांना मिळालेल्या जबाबदारीने पुन्हा दाखवून दिले आहे. काँग्रेसच्या पाठीमागे दलितांचे संघटन उभे करा. काँग्रेसला सर्वात जास्त ताकद देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले पाहिजे. त्यासाठी संघटन वाढवा आणि संघटन वाढवण्यासाठी संपर्क, समर्पण, संवाद, साधना, समन्वय या पाच घटकांवर भर द्या असे यावेळी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

  • बाबासाहेबांचा विचार घेऊन काम करा - वर्षा गायकवाड

काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य लोकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. संविधान व लोकशाहीला माननारा पक्ष आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची भूमिका कायम घेतली आहे म्हणूनच सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यालाही मोठी संधी काँग्रेसमध्ये दिली जाते. कार्यकर्ता चांगले काम करत असेल, निष्ठावान असेल तर पक्ष त्याची नक्की दखल घेते त्याचेच उदाहरण सिद्धार्थ हत्तीअंबिरे आहे. काँग्रेसचा विचार, बाबासाहेबांचा विचार घेऊन काम करत रहा, असे आव्हान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी केले.

हेही वाचा - Aryan Khan Drug Case LIVE : अखेर आर्यन खानला जामीन मंजूर; 'मन्नत'वर दिवाळी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.