मुंबई - कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा पेटण्याचे चित्र सध्या दिसत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प 2018 साली बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता, मात्र त्याला स्थानिक लोकांचा व शिवसेनेनं सत्तेत असूनही विरोध केला होता. प्रकल्प करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेची होती, त्यामुळे हा प्रकल्प रखडला. मात्र आता शिवसेना सत्तेत असल्याने हा प्रकल्प जर स्थानिकांचा विरोध नसेल तर करण्यास सरकार सकारात्मक आहे, असे आज स्थानिक आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे. यावर भाजपने शिवसेना डबल ढोलकी असल्याची टीका केली आहे.
स्थानिकानी मागणी केली तर हा प्रकल्प होईल -
जैतापूर येथे 90 टक्के लोकांनी जागा देऊन जास्त मोबदला घेतला आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्प होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अगोदर स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यामुळे स्थानिकांच्या पाठीशी राहून शिवसेनेने विरोध केला. मात्र सर्वांनी जागा दिल्या असल्याने आणि हा प्रकल्प व्हावा, असं स्थानिकांना वाटत असल्याने पुन्हा याचं काम सुरू झालं आहे. असाच नाणार प्रकल्पाला देखील स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेने विरोध केला. मात्र आता स्थानिक लोकांमध्ये या ठिकाणी नोकर्या नसल्याने तसेच विकास नसल्याने नाणार प्रकल्प व्हावा, असं काहीसं चित्र आहे. जर स्थानिकांची मागणी या प्रकल्प व्हावा अशी असेल, तर हाही प्रकल्प होईल. महाविकासआघाडी करेल असा आशावाद स्थानिक आमदार राजन साळवी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे.
नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना डबल ढोलकी, भाजपची टीका
२०१८ साली केंद्र सरकारने कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी स्थानिक लोकांबरोबरच भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही विरोध केला होता. मात्र आता लोकांचा विरोध मावळला असेल तर शिवसेना प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे शिवसेना नेते म्हणत आहेत. यावर भाजपने शिवसेनेवर डबल ढोलकी असल्याची टीका केली आहे.