ETV Bharat / city

भाजपने स्वताच्या स्वार्थासाठी वार्ड रचना बदलली- भाई जगतात

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार कॉंग्रसने केला आहे.

भाई जगतात
भाई जगतात
author img

By

Published : Feb 16, 2021, 8:03 PM IST

Updated : Feb 16, 2021, 8:28 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार कॉंग्रसने केला आहे. मुंबईतील विकास कामाची ब्ल्यू प्रिंट तयार करून लवकरच जनतेसमोर ठेवणार आहोत. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तत्कालीन भाजपा सरकारने केलेली वॉर्ड रचना आणि आरक्षण अत्यंत चुकीचे असून सर्व समाजातील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे यात बदल करण्याचा मागणीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. यावर काँग्रेसचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे प्रकरण निदर्शनात आणून देणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे.

वार्ड व प्रभात निहात सर्व नेत्यांशी चर्चा-

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई काँग्रेसच्या कार्यालय राजीव गांधी भवन येथे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेचा 227 जागेवर निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिका निवडणुकीसाठी वार्ड आणि प्रभागनिहाय सर्व नेत्यांशी चर्चा झाली, अशी माहिती काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

227 जागा लढणार-

काँग्रेस पक्षाची संपूर्ण ताकद पणाला लावून मुंबईवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकावण्याचा निर्धार आम्ही केला आहे. मुंबईतील 227 जागा लढण्याच्या तयारीसाठी आज आमची चर्चा झाली आहे. 100 दिवस 100 वॉर्ड हा उपक्रम देखील सुरु असून फेब्रुवारी महिन्याअखेरीस 25 ते 30 वॉर्डपर्यंत काँग्रेस पोहोचेल. तसेच प्रत्येक वॉर्डातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले आहे.

स्वतःच्या स्वार्थासाठी वार्ड रचना बदलली-

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी 2017 ला तत्कालीन फडणवीस सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी मुंबई महानगरपालिकेची वॉर्डची रचना आणि आरक्षण बदलले होते. त्याचा फायदा भाजपला झाला आहे. मात्र काँग्रेस पक्षाची भूमिका सर्व समाजातील घटकांच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेची वार्ड रचना निवडणुकीआधी सुधार करण्यात यावी. याबद्दत काँग्रेस पक्षाकडून एक अंतर्गत समिती गठीत करून यावर अभ्यास केलेला आहे. त्याचा अहवाल खूप गंभीर असून अनेक घटनात्मक तरतुदींची पायमली झाल्याचं निदर्शनात येत आहे. त्यामुळे निवडणुकीआधी वॉर्ड रचना आणि आरक्षण बदलण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे.

हेही वाचा- कोरोना : नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Last Updated : Feb 16, 2021, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.