मुंबई - राज्यातील सरकार स्थापने दिशेने शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने यानंतर आता भाजपच्या हालचालींना देखील वेग आल्याचे दिसत आहे. गुरूवारी भाजपने सर्व १०५ आमदारांसह सहकारी पक्षांच्या आमदार आणि समर्थन दिलेल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.
हेही वाचा... सत्तेतील सहभागाचा निर्णय पवार-सोनियांच्या भेटीनंतरच - काँग्रेस
या तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार
- राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर होणार चर्चा.
- अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना मदत करण्याचे कार्यक्रम आमदारांना सांगितले जातील
- बैठकीत भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीवर देखील चर्चा होणार.
हेही वाचा... राज्यपालांनी शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करावी - शिंदे
भाजपच्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रणजीत पाटील , शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार रावळ , सुभाषबापू देशमुख आणि इतर सर्व आमदार उपस्थित आहेत.