ETV Bharat / city

"महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू.." आशिष शेलारांचा कवितेतून महाविकासआघाडीला चिमटा - मुंबई शहर बातमी

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मांडलेल्या एका प्रस्तावावरून खडाजंगी झाल्यानंतर आता विरोधकांनी त्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे मुंबईतील आमदार आशिष शेलार यांनी या मुद्द्यावर महाविकासआघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

Ashish Shelar
आशिष शेलार
author img

By

Published : Jun 10, 2020, 4:47 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीतील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचा विभागातील मंत्रिमंडळात मंगळवारी एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावर सचिव आणि मंत्री यांच्यात मोठ्याप्रमाणात चर्चा आणि खडाजंगी झाली. शेवटी मंत्रिमंडळात मांडलेला प्रस्ताव मागे घेण्यात आला. सरकारमधील मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात काही प्रस्तावावरून समन्वय नसल्याचे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आले. त्यावर विरोधी पक्षातील आमदार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर सडकून टीका केलेली आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी हंगामाचा गहू किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना न सांगतात थेट मंत्रिमंडळ बैठकीत मांडला गेला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याचे काम मंत्र्यांनी करायचे असते. पण हा प्रस्ताव थेट सचिवांनी मांडायला सुरुवात केली. तेव्हा छगन भुजबळ यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला. मी या विभागाचा मंत्री आहे की नाही? ते आधी स्पष्ट करा, मग हा प्रस्ताव मांडा. असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला होता.

  • महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू
    मंत्री मोठा की, सचिव मोठा ते ठरवा आधी राऊ
    शेतकऱ्याचा गहु पावसात भिजेल.. भिजला तर भिजू दे
    मीच भुज"बळ"...मंत्री मंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे
    भाजीसह आंबा,कापूस, तूर, केळी उध्वस्त संत्री
    महाराष्ट्रात प्रोटोकॉलसाठी भांडतात बघा कसे मंत्री!

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... ठाणे : कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक केणी यांचा मृत्यू, कोरोनाशी देत होते झुंज

त्यानंतर सर्वच मंत्र्यानी आक्षेप घेतला. मंत्र्यांना अंधारात ठेवून प्रस्ताव आणण्याची हिंमत होते कशी, असा सवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. तर माजी मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळात कोणते प्रस्ताव आणायचे, हे नोकरशाही ठरवणार का? असा सवाल केला होता. मंत्रीमंडळातील या खडाजंगी वरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकार आणि प्रशासनात समन्वय नसल्याचे दाखवण्यासाठी कवितेतून चिमटा काढलेला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी या कवितेचे ट्विट केले आहे;

महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू

या कवितेतून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना चिमटा काढला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.