ETV Bharat / city

बीकेसी कोविड सेंटरमध्ये वस्तू खरेदीत भ्रष्टाचार, चौकशी करण्याची भाजपची मागणी - बिकेसी कोव्हीड सेंटर

बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केली आहे.

BJP alleges corruption in procurement of goods at BKC Coveid Center in mumbai
बिकेसी कोव्हीड सेंटरमध्ये वस्तू खरेदीत भ्रष्टाचार, भाजपचा आरोप
author img

By

Published : Jun 25, 2020, 7:02 PM IST

Updated : Jun 25, 2020, 8:46 PM IST

मुंबई - बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. तसेच या सेंटरची उभारणी करण्याचे काम दिलेल्या रोमिल बिल्डरशी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि सत्ताधारी यांचे काय संबंध आहेत याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे पालिकेतील विरोधी पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केली आहे.

भाजपचे मुंबई महापालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी गटनेते प्रभाकर शिंदे व मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बिकेसी येथील कोव्हीड सेंटरमध्ये वापरण्यात आलेल्या वस्तूमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. यावेळी बोलताना कोव्हीड सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यानी 2 हजार बेड असतील असे सांगितले होते. मात्र, यात 1 हजार ते दिड हजार बेड असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे.

बीकेसी कोविड सेंटरमध्ये वस्तू खरेदीत भ्रष्टाचार, चौकशी करण्याची भाजपची मागणी
बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये 2 हजार फॅन भाड्याने घेण्यात आले आहेत. त्यासाठी महिन्याला 3 हजार प्रमाणे तर तीन महिन्याचे 9 हजार रुपये भाडे देण्यात आले आहे. पालिकेने 2 हजार फॅनसाठी 1 कोटी 80 लाख भाडे दिले आहे. हेच फॅन जर पालिकेने खरेदी केले असते, तर अडीच ते तीन हजार रुपयाप्रमाणे 50 लाख रुपयांना विकत घेता आले असते. यावरून यात 1 कोटी 30 लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. 2 ते 3 हजार रुपयांना मिळणारे बेड, बेडशीट आणि उश्यांचे कव्हर पालिकेने 7 हजार रुपयांना घेतले आहे. यातही 1 कोटी 40 लाखांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. ऑक्सिजनसाठी लागणारे सिलेंडर 800 ते 1000 रुपयांना मिळते. तेच सिलेंडर पालिकेने 2 ते 5 हजार 500 रुपयांना घेतले आहे. पाण्याची एक बॉटल 24 रुपयांना पालिकेने विकत घेतली आहे. पालिकेने या वस्तू ज्या रोमिल बिल्डरने कोव्हीड सेंटर उभारले आहे, त्याच्याकडूनच विकत घेतल्या आहेत. यामुळे या बिल्डरशी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेळारासू व सह आयुक्त आनंद वागराळकर यांचा तसेच पालिकेतील सत्ताधारी शिवसेना व काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचा काय संबंध आहे, याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे.

Last Updated : Jun 25, 2020, 8:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.