ETV Bharat / city

Bjp Agitation For Nawab Malik Resign : नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आता रस्त्यावर; मुंबईत काढणार मोर्चा - Bjp Agitation Nawab Malik Resign

विधानमंडळानंतर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे. मुंबईत 9 मार्च रोजी भाजपाच्या वतीने नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढण्यात येणार ( Bjp Agitation For Nawab Malik Resign ) आहे.

Bjp Agitation For Nawab Malik Resign
Bjp Agitation For Nawab Malik Resign
author img

By

Published : Mar 5, 2022, 7:08 PM IST

मुंबई - मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे. परंतु, या मुद्द्यावर सरकारचे गांभीर्य दिसत नसल्याने आता ही लढाई रस्त्यावर लढली जाणार आहे. एकीकडे अधिवेशन सुरू असताना भाजपा नवाब मलिकांविरोधात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत मोर्चा काढणार ( Bjp Agitation For Nawab Malik Resign ) आहे.

मनी लॉन्ड्रिंग आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांसोबत जमीनाचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अशातच आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सलग २ दिवस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. मात्र, सरकारने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच आता येत्या ९ मार्चला भाजपाकडून मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान, असा भव्य मोर्चा काढला जाणार आहे.

राजीनामा न घेणे मुख्यमंत्र्यांची हतबलता

याबाबत बोलताना विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, नवाब मलिक यांनी देशद्रोही दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याकडून कवडीमोल भावाने जमीन विकत घेतली आहे. १९९३ च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये निष्पाप लोकांचा जीव गेला, याचे प्रायश्चित्त नवाब मलिक यांना भोगावे लागेल. तसेच, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खंडणी वसुली प्रकरणात अटक पण झाली नव्हती, तरी त्यांचा सरकारने राजीनामा घेतला. माजी वनमंत्री संजय राठोड यांचा देखील राजीनामा घेतला. पण, नवाब मलिक प्रकरणात इतके पुरावे असून, सुद्धा त्यांचा राजीनामा न घेण्यामागे मुख्यमंत्री यांची हतबलता दिसतेय, अशी टीकाही प्रविण दरेकर यांनी केली आहे.

सरकार हा विषय गांभार्याने....

दररोज विधानभवनाच्या पायर्‍यांवर मलिक यांच्या राजीनाम्याविषयी घोषणाबाजी केली जात आहे. त्यातच मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाकडून स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली. परंतु, आता सरकार हा विषय गांभीर्याने घेत नसल्याने ही लढाई रस्त्यावर लढली जाणार आहे. जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत, ही लढाई सुरूच राहणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाचे नेते, कार्यकर्ते, केंद्रीय नेते, मंत्री सहभागी होणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

हेही वाचा - Atul Londhe On Phone Tapping Case : रश्मी शुक्लांना आदेश देणाऱ्या 'बिग बॉस’चा शोध घ्यावा - अतुल लोंढे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.