ETV Bharat / city

कोरोना काळातही आयआयटीतील विद्यार्थ्यांना कोट्यवधींचे पॅकेज, ऑनलाइन प्लेसमेंटला सुरुवात - आयआयटीमध्ये प्लेसमेंट मुंबई

कोरोनामुळे सध्या देशात मंदीचे वातावरण असून, सर्व व्यवाहार ठप्प झाले आहेत. मात्र असे असताना देखील एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आयआयटी मुंबईत सुरू असलेल्या प्लेसमेंटमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल 18 कंपन्यांनी सहभाग घेतला.

Billions package to IIT students mumbai
आयआयटीतील विद्यार्थ्यांना कोट्यवधींचे पॅकेज
author img

By

Published : Dec 2, 2020, 2:08 AM IST

मुंबई - कोरोनामुळे सध्या देशात मंदीचे वातावरण असून, सर्व व्यवाहार ठप्प झाले आहेत. मात्र असे असताना देखील एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आयआयटी मुंबईत सुरू असलेल्या प्लेसमेंटमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल 18 कंपन्यांनी सहभाग घेतला.'ऑप्टिव्हर' या कंपनीने एका विद्यार्थ्याला तब्बल 1 कोटी 40 लाखांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे. तर आयआयटी मद्रास आणि आयआयटी मंडीमधील विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पॅकेजवर नोकऱ्या मिळाल्या आहेत.

देशातील सर्व आयआयटी कॉलेजमध्ये या वर्षीचा प्लेसमेंटचा हा पहिला हंगाम सुरू झाला आहे. आयआयटी मुंबईत पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात १८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, क्वालकॉम, बोस्टन कन्सलटिंग ग्रुप, यासरख्या कंपन्यांनी सहभाग घेतला. तर यंदा 153 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट पूर्व ऑफर्स स्वीकारल्या आहेत, असे संस्थेकडून सांगण्यात आले. देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्लेसमेंटवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत होती. मात्र पहिल्या हंगामातील प्लेसमेंटला कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सर्वाधिक नोकऱ्या आयटीमध्ये

या प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक नोकऱ्या या आयटी, सॉफ्टवेअर, कोअर इंजिनीअरिंग आणि कन्स्लटिंग या क्षेत्रात मिळाल्याचे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे. क्वालकॉम या कंपनीने ४६.४१ लाखांचे, वर्ल्डक्वाण्ट कंपनीने ३९.७० लाख, मॉर्गन स्टेन्ली या कंपनीने ३७.२५ लाख तर उबरने ३५.३८ लाख इतके वार्षिक पॅकेज देऊ केले आहेत. आयआयटी मद्रासमध्ये पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात १२३ विद्यार्थ्यांना ऑफर्स मिळाल्या आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, बजाज ऑटो, इस्रो या कंपन्यांचा समावेश होता. येथे मायक्रोसॉफ्टने सर्वाधिक १९ तर इस्रोने १० ऑफर्स दिल्या आहेत. आयआयटी मद्रासमध्ये यंदा सुमारे २५६ कंपन्यांनी नोंदणी केली असून यात ७१ स्टार्ट अप्सचा समावेश आहे.

ऑफर्स स्वीकारणाऱ्यांचे प्रमाण वाढले

आयआयटी मुंबईत सोमवारपासून ऑनलाइन प्लेसमेंटला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या काळातही अनेक कपंन्या यामध्ये सहभागी झाल्या असून, कंपन्यांकडून आलेली ऑफर स्वीकारणाऱ्या विद्यार्थांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे आयआयटी मुंबईकडून सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.