मुंबई : शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांच्या संबंधित असलेल्या टॉप्स ग्रुप सिक्युरीटी कंपनीने एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरविण्याच्या करारात घोटाळा MMRDA Security Guard Supply Scam केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून Mumbai Police Financial Crimes Branch गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात ईओडब्ल्यूने मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला सी समरी रिपोर्ट C Summary Report न्यायालयाने मंजूर केल्याने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा MLA Pratap Saranaik Court Relief मिळाला आहे याच तक्रारीचा आधार घेत ईडीने देखील तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचे ससेमिरे लागले होते. MLA Pratap Saranaik ED Investigation
आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित सुरक्षारक्षक पुरवठा करार घोटाळ्या प्रकरणी सी समरी रिपोर्ट कोर्टाने स्वीकारत सरनाईकांना दिलासा दिला
सी समरी रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टाने स्वीकारला - टॉप्स ग्रुप सिक्युरीटी कंपनीने एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरविण्याच्या करारात घोटाळा केल्या असल्याच्या आरोपा वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मूळ प्रकरणात ईओडब्ल्यूनं सादर केलेला सी समरी रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टाने स्वीकारला आहे. या प्रकरणात प्रताप सरनाईक यांच्या दोन निकटवर्ती आणि विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ईओडब्ल्यूने क्लीन चीट दिल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात अमित चांदोले आणि टॉप्स सिक्युरीटीचे माजी संचालक शशिधरन यांनी दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे.
ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश - ईडीनं दाखल करून घेतलेल्या प्रकरणाला अर्थ उरला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए संदर्भात नुकत्याच दिलेल्या निकालाच्या आधारावर दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निकालानुसार मुंबई सत्र न्यायालयानं नुकतीच ओमकार ग्रुपच्या दोन विकासकांची केलीय निर्दोष मुक्तता केले होते. मुंबई सत्र न्यायालयाकडून ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे.
काय आहे प्रकरण? टॉप्स कंपनीने MMRDA ला 500 सुरक्षा रक्षक कंत्राटानुसार दिले होते. त्यापैकी 70 टक्के सुरक्षा रक्षक कामावर येत होते. मात्र तरीही सर्वच 500 सुरक्षा रक्षकांचं वेतन काढलं जात असल्याचा आरोप रमेश अय्यर यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे FIR मध्ये केला होता.
सुरक्षा रक्षकांप्रमाणे निधी दिल्याचे नमूद - MMRDA ने आर्थिक गुन्हे शाखेला दिलेलेल्या अहवालात MMRDA ने 2013 ते 2017 आणि 2017 ते 2020 या सहा वर्षातील निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी सहा कंपन्यांना निविदा प्रक्रियेत मान्यता देण्यात आली. या सहा कंपन्यांपैकी एक टॉप्स सिक्युरीटी कंपनीही होती. टॉप्स सिक्युरिटीला MMRDA ने सुरक्षा रक्षक पुरवण्याचे जे कंत्राट दिलं त्या कंत्राटानुसार MMRDA ला सुरक्ष रक्षक पुरवण्यात आले. या टॉप्स सिक्युरिटी कंपनीने पुरवण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांप्रमाणे निविदा प्रकियेत नमूद केल्याप्रकारे निधी देण्यात आला असल्याचं या अहवालात म्हटलं होते.