ETV Bharat / city

Big Breaking news Live Page : औरंगाबाद : लसीकरण झाल्याची खात्री न करता पेट्रोल दिल्याने पंप सील - बातम्या

Big Breaking news Live Page : वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 21, 2021, 10:26 AM IST

Updated : Nov 21, 2021, 10:14 PM IST

22:12 November 21

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू 8 जण जखमी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आवंढणी गावानजीक झालेल्या इको कार आणि कंटेनर भीषण अपघात घडला असून यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 8 जखमी झाले असून त्यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

21:38 November 21

मुंबई-अहमदाबाद मार्गावर कार-कंटेनरची धडक; तीन ठार, नऊ जखमी

  • पालघर - एकविरा मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला
  • मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळ भीषण अपघात
  • इको कार आणि कंटेनरची जोरदार घडक
  • अपघातात तिघांचा मृत्यू, तर नऊ जण गंभीर जखमी

21:19 November 21

औरंगाबाद : लसीकरण झाल्याची खात्री न करता पेट्रोल दिल्याने पंप सील

औरंगाबाद - लसीकरण झाल्याची खात्री न करता पेट्रोल दिल्याने पंप सील

औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पंप करण्यात आला सील

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली होती पाहणी

पेट्रोल पंपावर कोरोना नियमांच पालन न केल्याने  

पुरवठा विभागाने रात्रीच्या वेळी पंप सिल केल्याने नागरिकांची गैरसोय

19:51 November 21

100 कोटी खंडणीप्रकणात रियाझ भाटी विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल

मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात खंडणीच्या प्रकरणात फरार असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांच्यासह रियाझ भाटी यांच्या विरोधात नवीन एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

17:16 November 21

पाच कोटींच्या ड्रग्जसह नायजेरियन तस्कराला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई - मुंबई गुन्हे अन्वेशषन विभागाने मुंबईतील चेंबूर-शिवडी मार्गावर एका नायजेरियन ड्रग्ज पेडलरला अटक केली आहे. त्याच्याजवळून पाच किलो एमडी व 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. बाजारभावाप्रमाणे यांची किंमत 5 कोटी 40 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला न्यायालयात हरज केले असता त्याला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती मुंबई क्राइम ब्रांचने दिली आहे. 

16:11 November 21

फडणीस यांचे आरोप बेजबाबदार, दोन्ही बाजूंच्या दोषींवर कारवाई करणार - यशोमती ठाकूर

मुंबई -  12 आणि 13 तारखेला अमरावतीत घडलेली घटना (Amravati violence) निंदनीय आहे. ज्यांनी आंदोलन भडकवण्याचे काम केले, त्याना सोडणार नाही.दोन्ही समाजातील नागरिकांवर चे गुन्हे दाखल होत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांचे आरोप बेजबाबदार असल्याचे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या. 

12:00 November 21

प्राप्तिकर विभागाची कारवाई

प्राप्तिकर विभागाने 18 नोव्हेंबर रोजी रसायन उत्पादने आणि रिअल इस्टेटसंबंधित एका प्रमुख गटावर छापा टाकला आणि जप्तीची कारवाई केली. गुजरातमधील वापी आणि सारीगाम, सिल्वासा आणि मुंबईतील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. मोठ्या प्रमाणात बेहिशेबी उत्पन्नाची कमाई दर्शविणारे पुरावे सापडले आहेत.  

12:00 November 21

भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. INS विशाखापट्टणम 21 नोव्हेंबरला सैन्यात सामील होणार आहे. रविवारी म्हणजेच आज मुंबईत होत असलेल्या कमिशनिंग सोहळ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावली.

10:24 November 21

राजस्थानमध्ये होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

गहलोत सरकारच्या मंत्रिमंडळाची रविवारी पुनर्रचना (Rajasthan Cabinet Reshuffle) होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मंत्रिमंडळात 11 कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.

10:23 November 21

उद्या लखनौमध्ये महापंचायत

येत्या 2 तारखेला लखनऊमध्ये महापंचायत (Mahapanchayat in Lucknow) आहे. त्यासाठी शेतकरी पूर्ण तयारीला लागले आहेत. लखनौच्या महापंचायतीत मंत्री अजय टेनी (Minister Ajay Tenny) यांच्या अटकेची मागणी करण्यात येणार असल्याचे राकेश टिकैत यांनी सांगितले. 

10:01 November 21

Big Breaking news Live Page : देवेंद्र फडणवीस अमरावती दाखल

अमरावती - हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis In Amravati ) हे आज अमरावती दाखल झाले आहेत. यावेळी ते दंगल झालेल्या भागांची पाहणी करणार असून भाजपाच्या जखमी कार्यकर्त्यांचीदेखील भेट घेणार आहेत.

दरम्यान, दंगलीनंतर (Amravati violence) आता राजकिय नेत्यांच्या भेटीगाठी शहरात सुरू झाल्या असून देवेंद्र फडणवीस यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी ते भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Last Updated : Nov 21, 2021, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.