मुंबई भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद Bhima Koregaon and Elgar Parishad प्रकरणातील आरोपी तथा लेखक मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखांच्या Human rights activist Gautam Navalkha जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाकडून निकाल Judgment by Special NIA Court on Gautam Navlakha Bail Application येणार होता; मात्र आज संबंधित 25 नंबर कोर्ट बसले नसल्यामुळे गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जावर आता 6 सप्टेंबर रोजी निकाल verdict on gautam navalkhas bail application येणार आहे. judgment on gautam navalkhas bail application
नवलखांना जामीन देण्यास तपास यंत्रणांचा विरोध गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जाला तपासणी करणाऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. नवलखा यांना जामीन देण्यात येऊ नये. जामीन दिल्यास या प्रकरणात वरील तपासावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आला होता. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखांसह इतर काही जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नवलखांना 28 ऑगस्ट 2018 रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून नवलखा तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
नवलखांनी वैद्यकीय सुविधा कारागृहात उपलब्ध करून देण्याचे आदेश नवलखांचे वाढते वय व आजारांमुळे त्यांना घरात नजरकैदेत ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. तळोजा कारागृहात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असल्यामुळे तातडीने योग्य उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे मला घरीच नजरकैदेत ठेवावे, अशी मुख्य मागणी करणारी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्या. एस. बी. शुक्रे आणि न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने ती फेटाळून लावली होती. नवलखा यांनी वैद्यकीय सुविधांबाबत विशेष NIA न्यायालयात अर्ज करावा, असे निर्देश न्यायालयाने आपल्या आदेशात दिले आहेत. तसेच नवलखा यांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा तळोजा कारागृह अधीक्षकांनी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
काय आहे भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरण?
पेशव्यांचे मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केलं होते. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा झाला होता. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्ये कारणीभूत होती. अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदेमागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहे, या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.