मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणात आरोप असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे आज 84 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर मुंबईमधील वांद्रा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्हेटिंलेटर असल्याने त्यांच्या जामिनासाठी कुटुंबियांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांचे सोमवारी निधन झाले.
फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी दुपारी दीड वाजता निधन झाल्याचे होली फॅमिली हॉस्पटिलचे संचालक डॉ. लॅन डिसुझा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पीठासमोर सांगितले. आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे फादर स्टेन यांना तळोजा तुरुंगातून २९ मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना आणि पार्किन्सनच्या आजारानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने जामिन मिळावा, अशी त्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
-
Maharashtra | Bhima Koregaon accused Stan Swamy passes away in Mumbai's Bhadra Hospital, where he had been admitted. Details awaited.
— ANI (@ANI) July 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | Bhima Koregaon accused Stan Swamy passes away in Mumbai's Bhadra Hospital, where he had been admitted. Details awaited.
— ANI (@ANI) July 5, 2021Maharashtra | Bhima Koregaon accused Stan Swamy passes away in Mumbai's Bhadra Hospital, where he had been admitted. Details awaited.
— ANI (@ANI) July 5, 2021
डॉक्टरांनी काय सांगितले न्यायालयात?
रविवारी सकाळी फादर स्टॅन यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती सावरली नाही. सोमवारी त्यांचे दुपारी निधन झाले. कोरोनानंतर झालेली गुंतागुंतीची स्थिती, फुफ्फुसात झालेला संसर्ग व पार्किसन्स हे मृत्यूचे कारण असल्याचे डॉक्टरांनी न्यायालयात सांगितले.
-
Heartfelt condolences on the passing of Father Stan Swamy.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He deserved justice and humaneness.
">Heartfelt condolences on the passing of Father Stan Swamy.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 5, 2021
He deserved justice and humaneness.Heartfelt condolences on the passing of Father Stan Swamy.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 5, 2021
He deserved justice and humaneness.
तळोजा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप-
तळोजा तुरुंग प्रशासनाने फादर स्टेन यांच्या प्रकृतीकडे तातडीने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्वामी यांचे वकील मिहीर देसाई यांनी केला. तळोजा तुरुंग प्रशासनाने फादर स्टेन यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा वकील मिहीर यांनी दावा केला.
राहुल गांधी यांनी व्यक्त केला शोक-
फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. ते मानवता आणि न्यायासाठी पात्र होते, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा- कोरेगाव-भीमा प्रकरण : एनआयए कोर्टाविरोधात फादर स्टॅन स्वामी मुंबई उच्च न्यायालयात
प्रकृतीसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) रविवारी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली होती. फादर स्टॅन स्वामी यांना तुरूंगात योग्य वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळावेत, यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे एनएचआरसीने रविवारी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या नोटीसीत म्हटले होते.
कोरेगाव भीमा प्रकरणी स्वामींना अटक करण्यात आली होती.