ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट : रो-रो सेवेच्या फेऱ्या बंद; 'मुहूर्त' चुकल्याची' नागरिकांमध्ये चर्चा !

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना, लोकांनी घराबाहेर पडणे कमी केले. त्यातच ही सेवा सुरू झाल्याने सुरुवातीलाच या सेवेला मोठा फटका बसला आहे. बुधवारी तर 'रो रो'ची एकही फेरी झाली नसून यापुढेही फेऱ्या बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सेवेचा 'मुहूर्त'च चुकल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

Ro Ro service closed due to corona
कोरोनामुळे रो रो सेवा बंद
author img

By

Published : Mar 19, 2020, 6:46 PM IST

मुंबई - भाऊचा धक्का ते मांडवा या दरम्यान रो-रो सेवा सुरू केल्यामुळे मुंबईहुन अलिबागला अवघ्या पाऊण तासात पोहोचणे शक्य झाले. मात्र, ही सेवा सुरू होऊन 4 दिवस झाले, तरीही रो-रो साठी प्रवासीच मिळत नसल्याने ही सेवा नावापुरती उरली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना, लोकांनी घराबाहेर पडणे कमी केले. त्यातच ही सेवा सुरू झाल्याने सुरुवातीलाच या सेवेला मोठा फटका बसला आहे. बुधवारी तर रो-रो ची एकही फेरी झाली नसून यापुढेही फेऱ्या बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सेवेचा 'मुहूर्त'च चुकल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

हेही वाचा... कोरोनाची आर्थिक झळ : इंडिगोकडून वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

कोट्यवधी रुपये खर्च करत 15 मार्चला रो रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रीसवरून आणलेल्या जहाजातून एकाचवेळी एक हजार प्रवासी आणि 200 कार वाहून नेणे यामुळे शक्य झाले आहे. या सेवेअंतर्गत दिवसाला 6 फेऱ्या होणार आहेत. मात्र, कोरोनाचा धोका वाढल्याने सेवा सुरू झाल्याच्या दिवसापासून प्रवासी मिळत नसल्याने रो-रो च्या फेऱ्याच होत नसल्याचे चित्र आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोनामुळे प्रवासी येत नसल्याने सेवा प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर परिस्थिती सुधरल्यानंतर नक्कीच या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा केला जात आहे.

हेही वाचा... कोरोनाचा फटका... तब्बल ३.८ कोटी भारतीयांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ही सेवा सुरू झाल्याने त्याचा फटका रो रो ला बसत आहेच. पण त्याचवेळी रो रो चे तिकीट महाग असल्यानेही प्रवासी पाठ फिरवत आहेत. कारसाठी 850 ते 1900 रुपये तर एका व्यक्तीला 220 रुपये तिकीट आहे. एसी तिकीट 330 तर लक्झरी तिकीट 550 रुपये आहे. एकूणच रो रो प्रवास महाग असल्यानेही प्रवासी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका टळल्यानंतर तरी रो रोला प्रतिसाद मिळतो का, हे लवकरच समजेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.