ETV Bharat / city

मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी

author img

By

Published : Jul 7, 2021, 4:40 PM IST

Updated : Jul 7, 2021, 4:55 PM IST

औरंगाबाद शहराचे दोनवेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष आणि दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी भाजपमध्ये जम बसविला. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजपने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.

Bhagwat Karad
भागवत कराड

मुंबई- केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होत असताना भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. यापूर्वीच खासदार डॉ कराड दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन अशी ओळख असलेले भागवत कराड हे आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करणार आहेत.

डॉ. भागवत हे कराड हे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील आहेत. औरंगाबाद शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना १९९६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला भाजपचे नगरसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी मराठवाड्यात भाजप वाढविण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.

हेही वाचा-एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अटकेबाबत मला काही माहित नाही - संजय राऊत

हेही वाचा-LIVE UPDATES : Modi Cabinet Expansion : मुंडे भगिनी नाराज? ट्विट करून दिली मुंबईत असल्याची माहिती

अशी राहिली भागवत कराड यांची राजकीय कारकीर्द

  • भाजपकडून राज्यसभा सदस्य ( २०२० )
  • भाजपचे सभागृह नेते, औरंगाबाद महानगरपालिका (१९९९ -२००९)३)
  • औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर ( एप्रिल २००० ते ऑक्टोबर २००१
  • नोव्हेंबर २००६ ते ऑक्टोबर २००७ - २ वेळा महापौर
  • औरंगाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर (१९९७-११९८ )
  • स्थायी समिती सदस्य, औरंगाबाद महानगरपालिका (१९९५-१९९७ )
  • औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक ( १९९५ ते २०१० या काळात तीन वेळा )

हेही वाचा-Dilip Kumar passes away : वाचा, दिलीप कुमार यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराला शिवसेनाप्रमुखांनी का केला होता विरोध?

मराठवाड्यातील ओबीसी चेहरा म्हणून डॉ. कराड यांना खासदारकी देण्यात आली होती. राज्यात ओबीसी अरक्षणावरून राजकारण तापत चालले आहे. त्यामुळे ओबीसी खासदाराला संधी देऊन ओबीसी समाजाला संधी दिल्याचा संदेश भाजपने संदेश दिला आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी निवड...
औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेनेची ताकद भाजपपेक्षा अधिक आहे, असे बोलले जाते. औरंगाबादेत गेल्या वीस वर्षांपासून लोकसभेची जागा शिवसेनाच्या ताब्यात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने औरंगाबादसाठी एक मंत्रिपद देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे खासदार डॉ भागवत कराड यांना संधी मिळल्याची चर्चा आहे.

Last Updated : Jul 7, 2021, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.