ETV Bharat / city

'ईटीव्ही भारत' विशेष - व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हयरल होणाऱ्या 'या' लिंकपासून सावधान, अन्यथा होऊ शकते नुकसान - व्हायरल लिंकमुळे आर्थिक नुकसान

गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना सक्रमण रोखण्यासाठी, तसेच कोरोना काळात बॅंका बंद असल्यामुळे डिजिटल व्यवहार वाढल्याचे पाहालया मिळत आहेत. सोशल अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने सुद्धा आता डिजिटल आर्थिक व्यवहाराचा पर्याय उलब्ध करून दिला आहे, मात्र याचा गैरवापर होत असल्याचे समोर येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हयरल होणाऱ्या पिंक लिंकपासून सावधान

author img

By

Published : Apr 19, 2021, 5:38 PM IST

मुंबई - गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना सक्रमण रोखण्यासाठी, तसेच कोरोना काळात बॅंका बंद असल्यामुळे डिजिटल व्यवहार वाढल्याचे पाहालया मिळत आहेत. सोशल अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने सुद्धा आता डिजिटल आर्थिक व्यवहाराचा पर्याय उलब्ध करून दिला आहे, मात्र याचा गैरवापर होत असल्याचे समोर येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर "व्हाट्सअ‍ॅप पिंक" नावाची एक लिंक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या अकांऊटमधील सर्व रक्कम, तुमची गोपनीय माहिती चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट

कशी होते फसवणूक?

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर पिंक नावाची लिंक व्हायरल झालेली आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरची ग्रीन थीम बदलून पिंक करायची असेल तर या लिंक वर क्लिक करा, व सांगितलेली माहिती पूर्ण भरल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपची थीम पिंक (गुलाबी) रंगाची होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र या लिंकवर क्लिक करताच या लिंकच्या माध्यमातून एक मालवेअर तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करतो, आणि तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती या मालवेअरच्या माध्यमातून चोरीला जावू शकते, त्यातून तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हयरल होणाऱ्या पिंक लिंकपासून सावधान

काय काळजी घ्याल?

सायबर तज्ज्ञ अंकुर पुराणिक यांनी सांगितले की, जर आपल्याला अशी लिंक प्राप्त झाल्यास तिच्याकडे दुर्लक्ष करा. चुकूनही व्हाट्सअ‍ॅप पिंक नावाच्या लिंकवर क्लिक करू नका. जर चुकून या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास, तुमच्या मोबाइल फोनमध्ये मालवेअर जाऊन तुम्हाला नुकसान होऊ शकते. सध्या कोरोना संक्रमण असल्यामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झालेली आहे. अशातच व्हाट्सअ‍ॅपने देखील डिजिटल पेमेंटचा पर्याय उलब्ध करून दिला आहे. मात्र अशा काही गोष्टींमुळे तुमच्या मोबाईलमधील सर्व गुप्त माहिती चोरीला जाऊ शकते आणि त्यातून तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्यासाठी तुमच्या मोबाईल फोनमध्ये अँटी व्हायरस सिक्युरिटी स्कॅन असणं गरजेचे आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या काळात इतर राज्यांमध्ये प्रवास करणार आहात...जाणून घ्या नियम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.