मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज मंगळवारी 6215 तर आतापर्यंत एकूण 1 लाख 25 हजार 625 लस देण्यात आली. त्यात 93,305 आरोग्य आणि 32,320 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आजही लसीचा दुसऱ्या डोसकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याने फक्त 212 जणांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आले होते. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 22 लसीकरण केंद्रांवर 105 बूथवर 4000 आरोग्य कर्मचारी तर 6500 फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण 10,500 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 1678 आरोग्य कर्मचारी तर 4537 फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण 6215 जणांना लस देण्यात आली. आज 4 जणांना सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 25 हजार 625 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
दुसऱ्या डोसकडे फिरवली पाठ -
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिला डोस घेतल्यापासून 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. काल सोमवारी फक्त 71 लाभार्थ्यांनीच दुसरा डोस घेतला होता. आज फक्त 212 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत कस्तुरबा रूग्णालय 1200, नायर रूग्णालय 16490, जेजे रूग्णालय 941, केईएम 15375, सायन रूग्णालय 6942, व्ही एन देसाई 1964, बिकेसी जंबो 12119, बांद्रा भाभा 5690, सेव्हन हिल रूग्णालय 8691, कूपर रूग्णालय 9744, गोरेगाव नेस्को 4817, एस के पाटील 1585, एम डब्लू देसाई रूग्णालय 942, डॉ. आंबेडकर रूग्णालय 13571, दहिसर जंबो 1460, भगवती रूग्णालय 1111, कुर्ला भाभा 451, सॅनिटरी गोवंडी 1760, बीएआरसी 917, माँ रूग्णालय 1356, राजावाडी रूग्णालय 14515, वीर सावरकर 1475, मुलुंड जंबो 2226 अशा एकूण 1 लाख 25 हजार 342 तर दुसरा डोस म्हणून 283 अशा एकूण 1 लाख 25 हजार 625 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा- नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊनला समोर जावे लागेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे