ETV Bharat / city

तौक्ते वादळ : ४ दिवसात मुंबईच्या किनाऱ्यावर आलेला १५३ टन कचरा पालिकेने उचलला - मुंबईतील चौपाट्या पुन्हा स्वच्छ

विशेषतः पावसाळ्यात उंच लाटांच्या प्रसंगी किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा आल्याची उदाहरणे मुंबईकर अनुभवतात. मात्र, यावेळी पावसाळ्यापूर्वीच तौक्ते वादळाने समुद्रातील कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकला. अशा प्रसंगांमध्ये देखील बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त यंत्रणा व मनुष्यबळ नेमून तातडीने किनारे व चौपाट्या स्वच्छ केल्या.

मुंबईच्या किनाऱ्यावर आलेला १५३ टन कचरा
मुंबईच्या किनाऱ्यावर आलेला १५३ टन कचरा
author img

By

Published : May 21, 2021, 6:49 AM IST

Updated : May 21, 2021, 7:04 AM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने खवळलेल्या समुद्रातून मुंबईतील सात चौपाट्यांवर चार दिवसात सुमारे १५३ मेट्रिक टन कचरा किनाऱ्यांवर आला होता. संपूर्ण महानगरात स्वच्छतेची नियमित कामे उरकत असताना, या सातही चौपाट्यांवरील कचरादेखील तातडीने हटवून चौपाट्या पूर्ववत स्वच्छ करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या स्वच्छाता विभागाने रात्रंदिवस प्रयत्न करुन हे सागरी किनारे स्वच्छ केले आहेत.

मुंबईच्या किनाऱ्यावर आलेला १५३ टन कचरा

तौक्ते वादळा नंतर स्वच्छता -

मुंबईत सोमवारी १७ मे रोजी तौक्ते वादळ आले होते. त्यादिवशी ११४ किलोमीटर वेगाने वारे वाहिले होते. समुद्रही खवळला होता, उंच लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. परिणामी या लांटासोबत समुद्रात खोलवर गेलेला कचरा किनाऱ्यावर येऊन पडला. विशेषतः पावसाळ्यात उंच लाटांच्या प्रसंगी किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा आल्याची उदाहरणे मुंबईकर अनुभवतात. मात्र, यावेळी पावसाळ्यापूर्वीच तौक्ते वादळाने समुद्रातील कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकला. अशा प्रसंगांमध्ये देखील बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त यंत्रणा व मनुष्यबळ नेमून तातडीने किनारे व चौपाट्या स्वच्छ केल्या.

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्र खवळल्यानंतर मुंबईतील सातही चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा आला होता. वादळाची तीव्रता असतानाही चारही दिवस म्हणजे १५ ते १८ मे २०२१ या चारही दिवशी नियमितपणे चौपाट्यांवर स्वच्छता करण्यात आली. त्यात कोणताही खंड पडला नाही. १५ मे रोजी ३३ हजार ११० किलोग्रॅम, १६ मे रोजी ३९ हजार ६१० किलोग्रॅम, १७ मे रोजी १९ हजार १०० किलोग्रॅम तर १८ मे २०२१ रोजी तब्बल ६२ हजार ०१० किलोग्रॅम इतका कचरा हटवून वाहून नेण्यात आला. चारही दिवसांत, सातही चौपाट्यांवर मिळून १५३ मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे. रात्रंदिवस अखंड प्रयत्न करुन या सर्व चौपाट्या स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेने मेहनत घेतली आहे.

७ चौपाट्यांवर स्वच्छता -

मुंबईमध्ये गिरगांव, दादर, चिंबई, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ आणि गोराई या प्रमुख सात चौपाट्या आहेत. या सात चौपाट्यांची मिळून एकूण लांबी ३६.५ किलोमीटर इतकी आहे. देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण स्थळ असणाऱया या सातही चौपाट्यांची नियमितपणे स्वच्छता महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून करण्यात येते. ही स्वच्छता राखण्यासाठी २४ X ७ तत्त्वावर कार्यरत राहणारी यंत्रणा आवश्यक त्या मनुष्यबळासह संयंत्रे घेऊन तैनात असते. यामध्ये चौपाटी स्वच्छता करण्यासाठी विशेष संयंत्रे जोडलेले ट्रॅक्टर, कॉम्पॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, २४० लीटर क्षमतेचे कचरऱ्यांचे डबे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. किनारऱ्यांवर सातत्याने येणारा कचरा नियमितपणे हटवून स्वच्छता ठेण्यासाठी होत असलेल्या विशेष प्रयत्नांमुळे चौपाट्या सदैव स्वच्छ राहत आहेत.

Last Updated : May 21, 2021, 7:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.