मुंबई - शूटिंग केल्याच्या संशयावरुन बार मालकाने एका ग्राहकाला विवस्त्र करून मारहाण केली. चेंबूरमधील राज पंजाब बारमध्ये हा घटना घडली. या प्रकरणी बार मालकविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
मारहाण केलेली व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चेंबूरमधील राज पंजाब या बारमध्ये पिडीत व्यक्ती दारू पिण्यास बसला होता. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने बारमधील शूटिंग केले होते. हा प्रकार बारच्या व्यवस्थापकास समजल्याने त्याने त्याच्या २ साथीदारांनी पिडीत व्यक्तीस मारहाण करून त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. होता. पिडीत व्यक्ती नशेमध्ये असल्याने तो घरी निघून गेला.

दुसऱ्या दिवशी पिडीत व्यक्ती राज पंजाब बारमध्ये मोबाईल मागण्यासाठी गेला असता त्यावेळी बार व्यवस्थापक जगदीश शेट्टी, बार चालविणारा सुखदेव पाटील व तेथे काम करणारा अब्दुल अजीज यांनी पिडीत व्यक्तीस विवस्त्र करून मारहाण केली.
या प्रकरणात पोलिसांनी बारचा वेटर अब्दुल अजीज याला अटक केली आहे. बार चालक सुखदेव पाटील, बारचा मॅनेजर जगदीश शेट्टी या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.